Babar Azam | Pakistan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

Pakistan Cricket: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून पाकिस्तानला बाहेर पडावे लागल्यानंतर सध्या कर्णधार बाबर आझमवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

Pranali Kodre

Babar Azam: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. काही बलाढ्य संघांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपले, यामध्ये गतउपविजेत्या पाकिस्तान संघाचाही समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यानेही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर टीका केली आहे. पाकिस्तानने पहिल्या फेरीत भारत आणि अमेरिका या संघांविरुद्ध पराभवाचा सामना केला, तर कॅनडा आणि आयर्लंड विरुद्ध त्यांनी विजय मिळवला.

मात्र, भारत आणि अमेरिकेने त्यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवत सुपर-8 फेरी गाठली. त्यामुळे पाकिस्तानचे आव्हान पहिल्या फेरीतच संपले.

यानंतर आता शोएब मलिकने म्हटले आहे की बाबर आझमने त्वरित नेतृत्वपद सोडले पाहिजे. मलिकने त्याच्या स्वत:चा अनुभवही सांगितला आहे. मलिकने २००७ साली टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले होते.

त्याने सांगितले की त्याला काही वर्षांनी पुन्हा नेतृत्व करण्याबद्दल विचारण्यात आले होते. पण त्याने ही विनंती नाकारली होती. मलिकच्या मते कर्णधारपदाची जबाबदारीचा परिणाम बाबरच्या फलंदाजीवर झाला.

टेन स्पोर्ट्सशी बोलताना मलिक म्हणाला, 'मला वाटते मी जर त्याच्याजागेवर असतो, तर मी त्वरित कर्णधारपद सोडले असते आणि माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले असते.'

'माझ्याबरोबर असे झाले होते, जेव्हा मला 2009-10 च्या दरम्यान पुन्हा एकदा कर्णधारपदाबाबत विचारण्यात आले होते, पण मी त्यासाठी नकार दिला. कारण मला फक्त माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे होते. मी असंच बोलत नाहीये, तर आकडेवारीही सर्वकाही सांगून जात आहे.'

बाबर आझमची गेल्या काही महिन्यातील कामगिरी खालवल्याचे दिसले आहे. त्याला टी20 वर्ल्ड कपमध्येही फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. तसेच त्याचे नेतृत्वही फारसे चांगले राहिले नसल्याचे मलिकने सांगितले.

तो म्हणाला, 'जर त्याच्या नेतृत्वात काही प्रगती असती, तर त्याने पुढेही नेतृत्व करायला हरकत नव्हती. परंतु, अशी कोणतीही प्रगती नाही. कर्णधार संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेऊ शकतो. त्याने तीन टी20 वर्ल्ड कप, एक वनडे वर्ल्ड कप, आशिया कप अशा स्पर्धांमध्ये नेतृत्व केले आहे, पण काहीच जिंकलेले नाही.'

दरम्यान, यापूर्वीही 2023 वनडे वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचे आव्हान लवकर संपल्यानंतर बाबर आझमवर टीका झाली होती. त्यानंतर त्याने तिन्ही क्रिकेट प्रकाराच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, यंदाच्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी त्याला पुन्हा पाकिस्तानचा टी20 कर्णधार म्हणून नेमण्यात आलेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT