Sourav Ganguly
Sourav Ganguly Rohit Sharma  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Sourav Ganguly : नेतृत्व बदलाचं विष शंकरासारखं पिणाऱ्या सौरव गांगुलीला विसरून कसं चालेल?

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly Rohit Sharma Captaincy : टी 20 वर्ल्डकप 2021 पूर्वीच धोनीनं दिलेलं कर्णधारपद विराट कोहलीनं सोडलं होतं. पायउतार होणारा कर्णधार घेऊन भारतीय संघ टी 20 वर्ल्डकप 2021 ला सामोरा गेला. मात्र भारताची कामगिरी सुमारच राहिली.

विराट कोहलीनं कॅप्टन्सी सोडली त्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली होता. गांगुली आपल्या बेधडक निर्णयांसाठी प्रसिद्ध आहे. त्यावेळी विराट अन् त्याच्यात वाद असल्याची चर्चा देखील होती. त्यातच विराटनं टी20 चं कर्णधारपद सोडलं. आयसीसी ट्रॉफीत भारताचं अपयश सर्वांनाच सलत होतं.

ज्यावेळी विराट कोहलीनं टी 20 संघाचं नेतृत्व सोडलं त्यावेळी टीम इंडियाचा पुढचा टी 20 कर्णधार कोण होणार याबाबत अनेक नावं चर्चेत होती. रोहित शर्माचं देखील नाव चर्चेत होतं. मात्र सौरव गांगुलीचं म्हणणं मान्य केलं तर रोहित शर्मा त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार होण्यास तयारच नव्हता. तसंही रोहित शर्मा हा काही तरूण खेळाडू नव्हता. भविष्याचा विचार केला तर तो अल्पकाळासाठीच टीम इंडियाचा कर्णधार होणार होता.

मात्र सौरव गांगुलीनं बळजबरीनेच रोहितच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली. टीम इंडियात दोन गट आहेत एक रोहितचा अन् एक विराटाचा असं चित्र निर्माण झालं. परंतू सौरवला माहिती होतं की एक नाही दोन नाही तर तब्बल 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद जिंकून देणे ही काही साधी गोष्ट नाही. रोहित में कुछ तो बात हैं!

रोहितकडं टी 20 चं कर्णधारपद आलं होतं याला फार काळ लोटला नव्हता. तेवढ्यात बीसीसीआयने विराट कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही उचलबांगडी केली. यानंतर विराट अन् बीसीसीआय विशेषकरून सौरव गांगुली यांच्यात ताणावाचं वातावरण निर्माण झालं. सौरवनं तो सर्व ताणाव आपल्या डोक्यावर घेतला अन् बीसीसीआयला वनडे अन् टी 20 मध्ये वेगवेगळा कर्णधार नको आहे असं ठासून सांगितलं. त्यानं थेट भारतीय क्रिकेटचा आयकॉन विराटशीच पंगा घेतला.

रोहितचा पहिला प्रयत्न 2022 चा टी 20 वर्ल्डकप हा होता. त्यात भारतानं सेमी फायनल गाठली. मात्र इंग्लंडविरूद्ध भारताचं गाडं अडलं. यश तसं समिश्र होतं. रोहितचा पहिला पेपर असल्यानं फार टीका झाली नाही. त्यानंतर नको नको म्हणताना कसोटीचं कर्णधार पद देखील रोहितच्याच गळ्यात पडलं. रोहितनं टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये पोहचवलं. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचं स्वप्न तोडलं.

त्यानंतर रोहितच्या कॅप्टन्सीवर अन् सौरवच्या निर्णयावर शंका घेतली जाऊ लागली. मात्र वनडे वर्ल्डकपमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने धडाकेबाज कामगिरी करत फायनलपर्यंत सर्व सामने जिंकून आपलं प्रभुत्व सिद्ध केलं. यामुळं सर्वांचाच रोहितच्या नेतृत्वावर विश्वास बसला. आता टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने अशाच प्रकारे डॉमिनंट कामगिरी केलं. सर्व सामने जिंकून फायनल गाठली. त्यानंतर रोमहर्षक सामन्यात कडव्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

ऑस्ट्रेलियाला गतविजेत्या इंग्लंडला मात देत ट्रॉफीच्या जवळ पोहचले. या कामगिरीनंतर रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक होत आहे. मात्र यात सौरव गांगुलीच्या बोल्ड निर्णयाचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यानं रोहितला टीम इंडियाची कॅप्टन्सी करण्यास मनवलं. प्रसंगी धमकीही दिली. त्याचं फळ आज टीम इंडिया चाखतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate : 'दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव द्या, अन्यथा गाई-म्हशींसह मंत्रालयासमोर आंदोलन करणार'; शिवसेनेचा इशारा

Raju Shinde : राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ? बैठकीनंतर शिंदेंनी नाराजी केली उघड; म्हणाले, 'तेच' आम्हाला ज्ञान शिकवत असतील तर...

Sonakshi Sinha : प्रेग्नेंसीच्या चर्चांवर अखेर सोनाक्षीने सोडलं मौन ; म्हणाली,"लग्न झाल्यावर..."

Manoj Jarange : ''सरकारने मला...'' शांतता रॅलीत मनोज जरांगेंना अश्रू अनावर; सांगितला १३ तारखेनंतरचा प्लॅन

'गोकुळ'ला आलेल्या 'त्या' निनावी पत्राच्या आधारे गुन्हे दाखल करा; औषध घोटाळ्याबाबत शौमिका महाडिक स्पष्टच बोलल्या

SCROLL FOR NEXT