SL vs RSA T20 WC 2024  ESAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

T20 World Cup 2024 : जरी श्रीलंकेने टी 20 क्रिकेटमधील आपली निच्चांकी धावसंख्या नोंदवली तरी आफ्रिकेला देखील त्यांनी जेरीस आणलं होतं.

अनिरुद्ध संकपाळ

SL vs RSA T20 WC 2024 : आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या चौथ्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 6 विकेट्सनी पराभव करत विजयाचं खातं उघडलं. श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 77 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्स गमावून 17 व्या षटकात पार केलं. आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 20 तर हेन्री क्लासेनने नाबाद 19 धावा केल्या. श्रीलंकेकडून कर्णधार वानिंदू हसरंगाने 2 विकेट्स घेत आफ्रिकेला एक एक धावेसाठी घाम गाळायला लावला.

श्रीलंकेला 77 धावात गुंडाळल्यानंतर हे आव्हान तगडी दक्षिण आफ्रिका 10 षटकांच्या आतच पार करेल असं वाटलं होतं. मात्र श्रीलंकेने देखील न्यूयॉर्कच्या गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर टिच्चून मारा केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले.

त्यानंतर क्विंटन डिकॉकने डाव सावरण्याचा प्रयत्न करत दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र यासाठी तब्बल 10 षटके वाट पाहावी लागली. उरलेल्या 27 धावांसाठी आफ्रिकेला पुन्हा 7 षटके फलंदाजी करावी लागली. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार वानुंदू हसरंगाने आधी क्विंटन डिकॉक आणि नंतर ट्रिस्टन स्ट्ब्जला बाद करत आफ्रिकेला टेन्शन दिलं होतं.

मात्र हेन्री क्लासेनने डेव्हिड मिलरच्या साथीने आफ्रिकेला 16.2 षटकात 80 धावा करून देत सामना खिशात टाकला. क्लासेनने नाबाद 19 धावा केल्या तर मिलरने नाबाद 6 धावा केल्या. श्रीलंकेकडून हसरंगाप्रमाणेच तुषारा आणि शानका यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. पथिराना आणि मॅथ्यूजने देखील चांगला मारा करत आफ्रिकेला चांगलेच सतावले.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT