David Miller
David Miller Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

David Miller Retirement: टी20 वर्ल्ड कप फायनलनंतर मिलरनेही खरंच घेतली निवृत्ती? पोस्ट करत स्वत: केला खुलासा

प्रणाली कोद्रे

David Miller: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरले.

या सामन्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर सोशल मीडयावर अशीही चर्चा झाली की दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यानेही निवृत्ती घेतली आहे, मात्र या चर्चेबद्दल आता स्वत: मिलरने खुलासा केला आहे.

मिलरने मंगळवारी (2 जुलै) इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यात त्याने निवृत्ती घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने त्याचा फलंदाजी करतानाचा फोटो पोस्ट केला होता. तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'मी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. मी दक्षिण आफ्रिकेसाठी यापुढेही खेळत राहणार आहे. अजूनही सर्वोत्तम येणे बाकी आहे.'

दरम्यान, मिलरची टी20 वर्ल्ड कप 2024 मधील कामगिरी चांगली झाली होती. त्याने अंतिम सामन्यातही भारताने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हेन्रिक क्लासेनची दमदार साथ देत 45 धावांची भागीदारी केली होती.

मात्र क्लासेन 52 धावांवर बाद झाला, तर अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर मिलरचा 21 धावांवर बाउंड्री लाईनवर सूर्यकुमार यादवने शानदार झेल घेतला होता. त्यानंतर मात्र, दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 8 बाद 169 धावाच करता आल्या.

या स्पर्धेत मिलरने अनेक छोट्या-मोठ्या पण महत्त्वपूर्ण खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी केल्या होत्या. मिलरने 8 डावांमध्ये 169 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत?; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा, खरा इतिहास काय?

Kiran Mane : "त्यांच्या आठवणीत वारीत नाचून बेभान होतो"; किरण माने यांनी सांगितली वारीची भावूक आठवण

Jharkhand Floor Test: एकही मत विरोधात न जाता हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; नेमकं काय घडलं?

Ishan Kishan: 'हो, मी ब्रेक घेतला आणि...', अखेर इशान किशनने देशांतर्गत क्रिकेट न खेळण्यावर सोडलं मौन

Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई; साचलेल्या पाण्यामुळे इंटरनेटवर मीम्सचा आला पूर.!

SCROLL FOR NEXT