Sunil Gavaskar | Rishabh Pant | Sanju Samson Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Sunil Gavaskar: टी20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला संधी मिळावी, याबद्दल सुनील गावसकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Sanju Samson or Rishabh Pant: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघव्यवस्थापनेसाठी प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे मोठे आव्हान आहे. त्यातही यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला संधी दिली जावी यावरून सध्या चर्चा होत आहे.

यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारताला ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचे पर्याय आहेत. आता यांच्यातील कोणाला संधी द्यावी याबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मत मांडले आहे. गावसकर यांच्यामते सॅमसनच्या आधी ऋषभ पंतला पसंती द्यायला हवी.

भारताच्या सराव सामन्यानंतर गावसकर यांनी आपले मत मांडले आहे. भारताने १ जून रोजी टी२० वर्ल्ड कपसाठी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला होता.

या सराव सामन्यात पंतने ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली होती. मात्र सॅमसनला छाप पाडण्यात अपयश आले होते. तो १ धावेवरच बाद झाला होता. पण असे असले तरी हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसले होते.

आता टी२० वर्ल्ड कपमधील भारताने पहिला सामना खेळण्यापूर्वी त्यांच्याबद्दल गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, 'जर तुम्ही यष्टीरक्षणाची क्षमतेची तुलना केली, तर ऋषभ पंत सॅमसनपेक्षा चांगला यष्टीरक्षक आहे. आपण इथे फलंदाजीबद्दल बोलत नाहीये, पण फलंदाजीही महत्त्वाची आहे.

'ऋषभ पंतने गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. दुसरीकडे सॅमसनने आयपीएल हंगामाची सुरुवात शानदार केली होती, तो चांगल्या धावा करत होता आणि चौफेर फटकेबाजी करत होता.'

गावसकर पुढे म्हणाले, 'आयपीएलच्या शेवटच्या 2-3 सामन्यांत त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चांगली संधी होती. जर त्याने 50-60 धावा केल्या असत्या, तर काहीच प्रश्न नव्हता. पण मला असं वाटतंय की भारतीय निवड समिती ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून पाहात असेल.'

भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध 60 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने 20 षटकात 5 बाद 182 धावा केलेल्या, तर बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 122 धावाच करता आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT