Virat Kohli, Suryakumar Yadav, Rohit Sharma
Virat Kohli, Suryakumar Yadav, Rohit Sharma Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

प्रणाली कोद्रे

T20 World Cup 2024, India vs South Africa: भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. शनिवारी (29 जून) बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केले.

दरम्यान, शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना अत्यंत रोमांचक झाला होता. पण या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघाला प्रेरणा देणारं भाष्य केलं होतं. याबद्दलच सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे.

सूर्यकुमारने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, 'त्याने आम्हाला गोष्टी सहजसोप्या ठेवण्यास सांगितले होते. त्याने सांगितले की 'मी हा डोंगर एकटा चढू शकत नाही. जर मला शिखरापर्यंत पोहचायचं असेल, तर मला सर्वांच्या ऑक्सिजनची गरत असणार आहे."

तसेच रोहितने सर्व खेळाडूंना नंतर पश्चाताप करण्यापेक्षा सर्वस्व देण्यास सांगितले होते.

अंतिम सामन्यात सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा घेतलेला झेलही महत्त्वाचा ठरला होता. दरम्यान, सूर्यकुमारन सांगितले की स्पर्धेच्या सुरुवातीलाच संघाने पुढे काय होणार, याचा विचार न करण्याचे ठरवले होते.

सूर्यकुमारने सांगितले की 'स्पर्धेपूर्वी आम्ही ठरवले होते की पुढे काय होणार आहे, याबद्दल चर्चा करायची नाही. कोणीही सुपर-8 चा विचार केला नव्हता आणि अंतिम सामन्याबाबतही तेच खरे होते. आम्हाला आमचे पाय जिथे आहेत, तिथंच आमचं मन ठेवायचं होतं. हाच आमचा हेतू होता.'

सूर्यकुमारने रोहितच्या नेतृत्त्वाबद्दल सांगितले की 'जेव्हा कठीण परिस्थिती असते, तेव्हा खेळाडूंना माहित असते रोहितचा त्यांना पाठिंबा असेल. त्यामुळे खेळाडूंना असं वाटतं की मला त्याच्यासाठी चांगली कामगिरी करायची आहे. कारण तो सर्वांनाच आत्मविश्वास आणि सन्मान देतो.'

याशिवाय, सूर्यकुमार म्हणाला, 'अनेक लोकांनी मला त्या झेलचे फोटो पाठवले होते. काहींनी त्या फोटोमध्ये बॉलच्या जागेवर ट्रॉफी ठेवलेलं एडिट केलं होतं.'

'मी हे क्षण दोन वर्ष माझ्याबरोबर ठेवेल आणि त्याची पुनरावृत्ती पुढील वर्ल्ड कपमध्ये करेल. ही माझी आयसीसीची चौथी स्पर्धा होती आणि माझा पहिला विजय होता. मी हा विजय दीर्घ काळासाठी लक्षाच ठेवेल, पहिला विजय खास असतो.'

अंतिम सामन्यात भारताने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 8 बाद 169 धावाच करता आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT