T20 World Cup 2021  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC मध्ये टीम इंडियावर आलीये मुंबई इंडियन्ससारखी वेळ!

लिंबूटिंबू संघाविरुद्धची फटकेबाजी टीम इंडियाला सेमी फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी पुरेशी नाहीये.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 Semi Final Scenario Calculations Net Run Rate युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान भारताला पहिल्या विजयासाठी अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. या सामन्यात टीम इंडियाने धावांची बरसात करत यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. आता स्कॉटलंड (Scotland ) आणि त्यानंतर नामिबिया विरुद्ध टीम इंडिया याच्याही पुढे जाऊन कदाचित आतापर्यंतच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या उभारेल. पण उर्वरित सामन्यात लिंबूटिंबू संघाविरुद्धची फटकेबाजी टीम इंडियाला सेमी फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी पुरेशी नाहीये. भारतीय संघातील स्पर्धेतील भवितव्य हे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील निकाल ठरवणार आहे.

6 गुणाचे गणित अन् नेट रनरेटचा खेळ

शुक्रवारी न्यूझीलंडचा संघ दुपारच्या सत्रात नामिबियाविरुद्ध (New Zealand vs Namibia) भिडणार आहे. दुसरीकडे भारतीय संघ स्कॉटलंड विरुद्ध (India vs Scotland) स्पर्धेतील चौथा सामना खेळणार आहे. यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड आहे. भारतीय संघाची सेमीफायनलचे तिकीट मिळवण्याची गणित ही 7 नोव्हेंबरला रंगणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असतील. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड संघाचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल.

जर अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला तगडी फाईट देऊन हा सामना जिंकला तर त्यांच्या खात्यात 6 गुण जमा होतील. त्यानंतर दुसरीकडे न्यूझीलंडने अखेरच्या सामन्यात नामिबियाला नमवले तर त्यांच्याही खात्यावर 6 गुण जमा होतील. 8 नोव्हेबरला भारतीय संघ नामिबियाविरुद्ध सुपर 12 मधील शेवटचा सामना खेळेल. यातील विजयासह टीम इंडियाही 6 गुणांपर्यंत पोहचू शकते. या परिस्थितीत नेट रनरेटचा खेळ ज्याच्या बाजूनं लागेल तो संघ सुपर 12 च्या दुसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानासह सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.

...तर टीम इंडियासह अफगाणिस्तानचा खेळही खल्लास

'जर-तर' च्या या गणितामध्ये नामिबियाचा संघ भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होईल आणि अफगाणिस्तान न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देईल, असे गणित मांडले आहे. पण जर न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही सामने कसेबसे जरी जिंकले तरी त्यांचा सेमी फायनलमधील प्रवेश पक्का होईल. आणि अफगाणिस्तानसह टीम इंडिया स्पर्धेतून आउट होईल.

सुपर 12 मध्ये आयपीएलच्या प्ले ऑफसारखी ट्विस्ट

युएईच्या मैदानात झालेल्या आयपीएल स्पर्धेत पाचवेळा जेतेपद पटकवणारा मुंबई इंडियन्सला प्रबळ दावेदार मानले गेले. पण मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्येही स्थान मिळाले नव्हते. साखळी सामन्यातील महत्त्वाच्या लढती गमावल्यानंतर प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी जी चुरस झाली त्यात नेट रनरेटचा खेळ पाहायला मिळाला होता. राजस्थानने कोलकाताच्या संघाला पराभूत केले तर हैदराबादला विजय मिळवून मुंबई इंडियन्सला प्ले ऑफसाठी पात्र ठरता येणार होते. यासाठी त्यांना मोठ्या फरकाने विजय नोंदवायचा होता. हैदराबादविरुद्ध 200 पेक्षा अधिक धावा करुन मुंबईने दिमाखदार विजय नोंदवला खरा. पण नेट रनरेटच्या जोरावर कोलकाता पात्र ठरले होते. अशीच काही ट्विस्ट सुपर 12 मध्येही सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी सुरु आहे. यात टीम इंडियाची गतही मुंबई इंडियन्ससारखी दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT