Rohit Sharma Vs Shaheen Afridi  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात रोहित गडबडला

शाहिन आफ्रिदीनं कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सलामी जोडीला माघारी धाडले.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या लढतीत टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. शाहिन आफ्रिदीनं अप्रतिम यॉर्कर चेंडूवर रोहितला पायिचत केले. त्याला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाहिन आफ्रिदीनं त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत सलामी जोडीला माघारी धाडले.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन देतील, अशी आशा होती. पण सलामीची जोडी फ्लॉप ठरली. सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहितला शाहीन आफ्रीदीने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर चालते केले. लोकेश राहुलला बाद करत शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शाहीन आफ्रिदी भारतीय संघाची डोकेदुखी वाढवू शकतो, असे यापूर्वीही बोलले जात होते. शाहीनने तेच करुन दाखवले. दमदार गोलंदाजी करुन टीम इंडियाला बॅकफूटवर टाकले. अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा डाव सावरणाऱ्या किंग कोहलीची विकेटही त्यानेच घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT