IREvNED Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : 'गलती पे मिस्टेक' रन आउट करताना एक बेल्स आधीच पडली, अन्...

दोघांच्यातील ताळमेळाच्या अभावामुळे संघाला पहिल्या विकेटच्या रुपात फटका बसला.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 Ireland vs Netherlands 3rd Match : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अ गटातील आयर्लंड आणि नेदरलंड यांच्यात दुबईच्या शेख झायद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi ) सामना सुरु आहे. नेदरलंड कर्णधार पीटर सीलरने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅक्स ओडाउड आणि बेन कोपर या जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. पण पहिल्याच षटकात या जोडीत गोंधळ पाहायला मिळाला. दोघांच्यातील ताळमेळाच्या अभावामुळे संघाला पहिल्या विकेटच्या रुपात फटका बसला.

नेदरलंडच्या डावातील पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेन कोपर धावबाद होऊन तंबूत परतला. सिमी सिंगने स्केवअर लेगला फटकावलेला चेंडू पकडत पॉल स्टर्लिंगकडे टाकला. यावेळी स्टर्लिंगकडून मोठी चूक झाली. त्याने चेंडू स्टंपच्या पुढे पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्टंपवरील एक बेल्स आधीच खाली पडली. ही चूक भरुन काढत त्याने दुसरी बेल्स उडवत संघाला पहिले यश मिळवून दिले. फलंदाज क्रिजच्या बाहेर असतानाही तिसऱ्या पंचांनी विकेटसंदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळ घेतल्याचे पाहायला मिळाले. याला एक खास कारण आहे.

ज्यावेळी खेळाडूला रन आउट केले जाते त्यावेळी बेल्स पडणे गरजेचे असते. एक बेल्स आधीच पडली होती. जर दुसरी बेल्सही आधीच पडली असती तर विकेटसाठी स्टंप पाडणे महत्वाचे असते. जर असे झाले नाही तर विकेट दिली जात नाही. स्टर्लिंगने एक बेल्स आधीच पाडली असली तरी दुसरी बेल्स स्टंपवर असल्यामुळे आयर्लंडच्या खात्यात एक विकेट जमा झाली. रन आउट करताना स्टर्लिंगने स्टंप उखडण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसले. त्याच्याही मनात बेल्स आधीच पडल्याचा संभ्रम असल्यामुळेच त्याने हा प्रकार केल्याचे पाहायला मिळाले.

रन आउट करताना फिल्डर किंवा बॉलरने काय करावे आणि काय करु नये. याचा एक साधा नियम आहे. स्टम्पच्या पुढे बॉल अडवून घाई करण्याची पद्धत फारच चुकीची आहे. तुम्ही स्टंपच्या मागे असाल तर योग्य पद्धतीने तुम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump: विजयानंतर ट्रम्प यांना पहिला फोन मोदींचा; म्हणाले, माझ्या मित्रासोबत...

Elon Musk on Trump Victory: ट्रम्प यांच्या विजयावर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अपरिहार्य...

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT