T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: वर्ल्ड कप ठरतोय रोमांचक! दोन दिवसात 5 सामन्यांत झाले मोठे उलटफेर

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत गेल्या 2 दिवसात अनेक धक्कादायक निकाल लागल्याचे पाहायला मिळाले आहेत.

Pranali Kodre

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेला 1 जून पासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत 14 सामने खेळून झाले आहेत. दरम्यान, या आत्तापर्यंत झालेले जवळपास सर्वच सामने रोमांचक झाले आहेत.

खरंतर क्रिकेटलाच अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, पण त्यातही टी20 क्रिकेट हा बेभरवशाचे असल्याचेही म्हटले जाते. कारण या प्रकारात कधी सामना पलटेल सांगता येत नाही. एखादे षटकही सामना पूर्णपणे पालटवू शकते. हेच टी20 वर्ल्ड कपमधील मागील काही सामन्यांमधून दिसून आले आहे.

गेल्या 2 दिवसात जवळपास 5 संघांनी मोठे उलटफेर केले आहेत. म्हणजे तुलनेने नवख्या संघांनी मोठ्या आणि बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारली आहे. याच चार संघांनी केलेल्या कामगिरीवर एक नजर टाकू.

पाकिस्तान विरुद्ध अमेरिका

6 जून 2024 रोजी झालेल्या सामन्यात नवख्या अमेरिका संघाने पाकिस्तानला डेलासला झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला. हा अमेरिकेचा सलग दुसरा विजय होता, त्यामुळे त्यांनी ग्रुप एमध्ये अव्वल क्रमांकही मिळवला.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 159 धावा केल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेलाही 20 षटकात 3 बाद 159 धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 18 धावा केल्या, पण पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 1 बाद 13 धावाच करता आल्या.

स्कॉटलंड विरुद्ध नामिबिया

बार्बाडोसला 7 जूनला झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने नामिबियाला 5 विकेट्सने पराभूत केले. हा स्कॉटलंडचा नामिबियाविरुद्ध मिळवलेला पहिलाच टी20 विजय ठरला.

या सामन्यात नामिबियाने 20 षटकात 9 बाद 155 धावा केल्या होत्या. त्यानंतर स्कॉटलंडने 20 षटकात 5 बाद 157 धावा करत विजय मिळवला.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका

बांगलादेश आणि श्रीलंका हे देखील क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे त्यांच्यातील सामनाही रोमांचक होतो. 8 जूनला या दोन संघात झालेला सामनाही रोमांच झाला, ज्यात बांगलादेशने श्रीलंकेला अवघ्या 2 विकेट्सने पराभूत केले. हा बांगलादेशचा टी20 वर्ल्ड कपमधील श्रीलंकेविरुद्धचा पहिला विजयही ठरला.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 124 धावा केल्या होत्या. त्यानंतर 125 धावांचे लक्ष्य बांगलादेशने 19 षटकात 8 विकेट्स गमावत पूर्ण केले.

कॅनडा विरुद्ध आयर्लंड

7 जूनला न्युयॉर्कला झालेल्या सामन्यात कॅनडाने आयर्लंडला पराभवाचा धक्का दिला. हा कॅनडाचा टी20 वर्ल्ड कपमधील पहिला विजय देखील ठरला. या सामन्यात कॅनडाने 20 षटकात 7 बाद 137 धावा करत आयर्लंडला 138 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु आयर्लंडला 20 षटकात 7 बाद 125 धावाच करता आल्याने 12 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

अफगाणिस्तान विरुद्ध न्युझीलंड

8 जूनला गयाना येथे झालेल्या सामन्यात न्युझीलंडला अफगाणिस्तानविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. हा अफगाणिस्तानचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी सी ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकही पटकावला.

या सामन्यात अफगाणिस्तानने 20 षटकात 6 बाद 159 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला 160 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 15.2 षटकात 75 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे अफगाणिस्तानने 84 धावांनी मोठा विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT