T20 World Cup 2024  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये हे 5 खेळाडू ठरू शकतात 'मालिकावीर'

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 : युएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये होत असलेला टी 20 वर्ल्डकप 2024 हा एका रंजक वळणावर पोहचला आहे. ग्रुप स्टेज संपून आता सुपर 8 चे सामने सुरू होत आहेत. ग्रुप स्टेजमध्ये अनेक मोठे संघ आपला गाशा गुंडाळून मायदेशी परतले आहेत. तर युएसए, अफगाणिस्तान सारख्या संघांनी सुपर 8 फेरी गाठून कमाल केली आहे.

ग्रुप स्टेजमध्ये काही खेळाडूंनी दमदार कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या पाच खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलंदाजांचा समावेश आहे.

मार्कस स्टॉयनिस

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मार्कस स्टॉयनिस हा पर्पल पॅचमध्ये दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूने चार सामन्यात 190 च्या स्ट्राईक रेटने 156 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकी खेळींचा देखील समावेश आहे. गोलंदाजीत त्यानं 5.77 च्या इकॉनॉमीने सहा विकेट्स देखील घेतल्या.

शेरफेन रूदरफोर्ड

वेस्ट इंडीजचा फलंदाज शेरफेन रूदरफोर्डने आपल्या तडाखेबाज खेळीने देखील सर्वांना प्रभावित केलं आहे. यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. रुदरफोर्डने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात 39 चेंडूत 68 धावा केल्या होत्या.

याचबरोबर रूदरफोर्डच्या या खेळीमुळे वेस्ट इंडीजने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. रूदरफोर्ड हा मोठमोठे षटकार मारण्यात तरबेज आहे. सुपर 8 मध्ये रूदरफोर्ड धमाका करून शकतो. त्यामुळे तो सामनावीराच्या पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

जसप्रीत बुमराह

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील सामनावीराच्या पुरस्कार मिळवण्यासाठी आघाडीवर आहे. त्याने तीन सामन्यात 5 विकेट्स घेतल्या असून त्याची इकॉनॉमी ही सहाच्या आतच आहे. तो विकेट घेण्याबरोबरच धावा रोखण्यात देखील प्रभावी ठरत आहे. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याने 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

एन्रिच नॉर्खिया

दक्षिण आफ्रिकेचा नॉर्खिया यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये प्रभावी मारा करत आहे. तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 4 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 7.78 च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

फजल फारूकी

फजल फारूकीने 4 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. तो यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ससर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये फारूकीचा मोलाचा वाटा आहे. आता सुपर 8 मध्ये देखील फजल फारूकीची भुमिका महत्वाची असणार आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Editorial Article : अग्रलेख - विकृतीला पायबंद

Sakal Editorial Article : भाष्य - अमेरिकी निर्बंधांचे 'औषध'

Sakal Editorial Article : हौस ऑफ बांबू - 'पुरुषोत्तम' साठीचा झाला नव्हं..!

सकारात्मक विचारसरणीचे फायदे

‘आहारही काटेकोर हवा’

SCROLL FOR NEXT