Afghanistan Cricket Team X/ACBofficials
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: अफगाणिस्तानचा PNG वर दणदणीत विजय अन् न्यूझीलंड थेट स्पर्धेतूनच बाहेर

AFG vs PNG: टी20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने सलग तिसरा विजय मिळवत सुपर-8 मध्ये स्थान पक्के केले आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 AFG vs PNG: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 29 व्या सामन्यात अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीला (PNG) 7 विकेट्सने पराभूत केले आहे. हा अफगाणिस्तानचा सलग तिसरा विजय ठरल्याने त्यांनी सी ग्रुपमधून सुपर-8 फेरीत स्थान पक्के केले आहे. त्यामुळे न्युझीलंड संघाचे आव्हान अधिकृतरित्या संपले आहे.

अफगाणिस्तानने ग्रुप सी मधून सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. या ग्रुपमधून याआधीच वेस्ट इंडिजने तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला होता.

त्यामुळे प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ पुढे जाणार असल्याने आता सी ग्रुपचे समीकरण पूर्ण झाले असून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने पुढच्या फेरीत स्थान पक्के केल्याने या ग्रुपमध्ये असलेल्या युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंड या तिन्ही संघांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

दरम्यान, त्रिनिदादला पार पडलेल्या सामन्यात पीएनजीने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 96 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानने 15.1 षटकातच 3 विकेट्स गमावत पूर्ण केला.

अफगाणिस्तानने 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या दोन विकेट्स झटपट गमावल्या होत्या. पण नंतर गुलबदिन नाईबने अफगाणिस्तानचा डाव सावरला.

त्याने अममतुल्लाह ओमरझाई आणि मोहम्मद नबी यांना साथीला घेत अफगाणिस्तानला सोपा विजय मिळवून दिला. नाईबने 36 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावा केल्या. तसेच ओमरझाईने 13 धावा केल्या. तसेच नबीने 16 धावांची नाबाद खेळी केली.

पीएनजीकडून अलेई नाओ, सेमो कामीया नॉर्मन वानुआ यांनी प्रत्येती 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, अफगाणि्स्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पीएनजी प्रथम फलंदाजीसाठी उतरले. मात्र, अफगाणिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर पीएनजीने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यातच त्यांचे ३ फलंदाज धावबाद झाले. त्यामुळे पीएनजीला 19.5 षटकात सर्वबाद 95 धावा करता आल्या.

पीएनजीकडून किप्लीन डोरिगाने सर्वाधिक 27 धावा केल्या. त्याच्याशिवाय सलामीवीर टोनी उरा (11) आणि अलेई नाओ (13) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

वेस्ट इंडिजकडून फझलहक फारूकीन सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच नवीन उल हकने 2 विकेट्स घेतल्या, तर नूर अहमदने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT