T20 World Cup 2024, Australia vs Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघात अर्नोस वेल ग्राऊंड, किंग्सटाऊन, सेंट विन्सेंट येथे सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवत इतिहासही घडवला.
पण याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रेहमनुल्ला गुरबाज यांच्यात शाब्दिक युद्धही पाहायला मिळालं.
झालं असं की या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानने दमदार सुरुवात केली होती. त्यांचे सलामीवीर गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी शतकी भागीदारी केली. 15 षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियाला एकही विकेट मिळाली नव्हती.
त्यातच 16 व्या षटकात स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर गुरबाजने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता. पण त्यानंतर पाचव्या चेंडूवर गुरबाजला स्टॉयनिसने डेव्हिड वॉर्नरच्या हातून झेलबाद केले. यावेळी स्टॉयनिसने त्याला अनोखा सेंडऑफ दिला होता. त्याने त्याचे दोन्ही हात वर करत पंजे हालवले होते.
त्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाकडून स्टॉयनिस सहाव्या षटकात फलंदाजीला उतरला, तेव्हा त्याने फलंदाजी करण्यापूर्वीच या दोन खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली होती. ते एकमेकांना काहीतरी बोलताना दिसले होते. त्यातच स्टॉयनिस 11 व्या षटकात 11 धावांवर बाद झाला.
त्याचा झेल गुलबदिन नायबच्या गोलंदाजीवर गुरबाजनेच पकडला. त्यानंतर गुरबाजनेही जोरदार सेलीब्रेशन केले होते. दरम्यान, स्टॉयनिस आणि गुरबाजमधील या गरमागरमीचा व्हिडिओ आयसीसीनेही शेअर केला आहे.
दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर अफगाणिस्तानकडून गुरबाजने 49 चेंडूत 60 धावांची खेळी केली, तर इब्राहिम झाद्रानने 48 चेंडूत 51 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र अफगाणिस्तान 20 षटकात 6 बाद 148 धावांपर्यंत पोहचू शकले.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने हॅट्रिक घेतली. कमिन्सने 3 विकेट्स घेतल्या, तर ऍडम झाम्पाने 2 विकेट्स घेतल्या, तर स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 19.2 षटकात सर्वबाद 127 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त केवळ स्टॉयनिस (11) आणि कर्णधार मिचेल मार्श (12) यांनीच दोन आकडी धावसंख्या पार केली.
अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अझमतुल्लाह ओमरझाई, कर्णधार राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.