Australia Cricket team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: भारताविरुद्ध जिंकली तरी ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपमधून जाणार बाहेर? समीकरण आले समोर

T20 World Cup 2024, Semi-Final Equation: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 फेरीत भारताविरुद्ध विजय मिळवला तरी ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार असणार आहे.

Pranali Kodre

India vs Australia: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुपर-8 मधील सामना रंगणार आहे. हा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट ल्युसिया येथे पार पडणार आहे.

उपांत्य फेरीत पोहचण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकल्यास ते थेट उपांत्य फेरीत पोहचणार आहे, तर ऑस्ट्रेलियाने जर हा सामना जिंकला, तर ते देखील उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करतील.

मात्र, असे असले तरी त्यांना विजय मिळवल्यानंतरही 25 जून रोजी होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

सध्या सुपर-8 फेरीची गुणतालिका पाहिली तर अ ग्रुपमध्ये भारतीय संघ २ सामन्यातील विजयासह 4 गुण मिळवत 2.245 नेट रन रेटसह अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया 2 सामन्यांतील एक विजय आणि एका पराभवासह 2 गुण मिळवत 0.223 नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्ताननेही 2 सामन्यांतील 1 विजय आणि 1 पराभवासह २ गुण मिळवत - 0.650 नेट रन रेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या ग्रुपमध्ये अखेरच्या क्रमांकावर बांगलादेश आहे. त्यांना दोन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे, त्यांचा -2.489 नेट रन रेट आहे.

असे आहे समीकरण

दरम्यान, आता एकूण गणित लक्षात घेतलं, तर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विजय मिळवला, तरी अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. पण त्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला 1 धावेने पराभूत केले, तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध कमीत कमी 36 धावांनी विजय मिळवावाच लागेल.

याशिवाय जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला, तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्धचा सामना कमीत कमी 15.4 षटकातच जिंकावा लागणार आहे. म्हणजे अफगाणिस्तानला आपले आव्हान टिकवण्यासाठी काहीही करून बांगलादेशविरुद्ध मोठाच विजय मिळवावा लागणार आहे.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 25 जून रोजी पहाटे 6.00 वाजता चालू होणार आहे. हा सामना सेंट विन्सेंटला खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT