T20 World Cup 2024 Final India vs South Africa  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs SA T20 WC 24 Final : विश्वविजेतेपदाची पुन्हा रुंजी! रोहितची भारतीय सेना आज टी-२० क्रिकेटचे जगज्जेते होणार?

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

T20 World Cup 2024 Final India vs South Africa : सात महिन्यांपूर्वी मायदेशात हातात येत असलेला एकदिवसीय विश्वकरंडक थोडक्यात निसटला होता. ते अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ उंबरठ्यावर उभा आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियासह लाखो-करोडो भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाच्या रुंजींनी मनात फेर धरला आहे. या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अपराजित राहिलेले भारत आणि दक्षिण आफ्रिका आज आमने-सामने येत आहेत.

बार्बाडोसमध्ये लग्न घटिका जवळ आल्याचा भास होतो आहे. कागदावर दोन्ही संघाचे बलाबल अगदी जसेच्या तसे चांगले असल्याने क्रिकेट रसिकांमध्ये अंतिम सामन्याची उत्सुकता वाढली आहे. उपांत्य सामन्याप्रमाणेच शनिवारी पावसाळी ढगाळ हवा राहण्याची शक्यता वर्तवली गेली असली तरी पावसाने फार मोठा घोळ होणार नाही, अशी माहिती स्थानिक हवामान खात्याने दिली आहे. योग्य खेळाडूंचे मिश्रण घेऊन, दमदार खेळ करून अंतिम फेरीत पोहोचल्याची भावना दोन्ही संघात असल्याने शनिवारच्या लढतीसाठी संघात कोणताही बदल केला जाईल, असे वाटत नाही.

अनुभवी फलंदाज, दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि गुणवान फिरकी गोलंदाज अशीच भारत आणि द. आफ्रिकन संघाची जडणघडण आहे. फरक आहे तो कप्तानाचा. द. आफ्रिकेचा कप्तान एडन मार्करम पहिल्यांदाच अशा मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणार आहे. भारतीय कप्तान रोहित शर्माच्या पाठीशी मोठ्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कप्तान म्हणून उतरण्याचा भरपूर अनुभव आहे. त्यामुळे दडपणाचा थोडा जास्त बोजा मार्करमवर असण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची बांधणी करताना सखोल विचार केला होता. इथल्या खेळपट्ट्यांचा अंदाज लावत चार फिरकी गोलंदाज भारतीय संघात घेतले गेले. तोच रोहितचा अंदाज बरोबर ठरला आहे, कारण जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल योग्य परिणाम साधून दाखवत आहेत. अक्षर पटेलवर अष्टपैलू खेळाडू म्हणून ठेवलेला विश्वास त्याने सार्थ करून दाखवला आहे. कुलदीप यादवच्या फिरकीचा भल्या भल्या फलंदाजांना अंदाज लागत नाही. त्यामानाने रवींद्र जडेजानेच अजून सर्वोत्तम खेळ केला नाही. अर्थातच गोलंदाजीच्या फळीचा नेता जसप्रीत बुमरा रोहित शर्मासाठी हुकूमाचा एक्का ठरला आहे.

फलंदाजीत विराट कोहलीचा अपयशाचा पाढा सोडला, तर बाकीच्या फलंदाजांनी आपापली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. रोहितच्या भन्नाट फलंदाजीला सूर्यकुमार यादवने चांगली साथ दिली आहे. खेळाबरोबर वैयक्तिक जीवनात कठीण काळातून गेलेल्या हार्दिक पंड्याने असंख्य अडचणींना तोंड देत अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकन फलंदाजीची मुख्य मदार डावखुरा फलंदाज क्विंटन डिकॉकवर आहे. कप्तान मार्करम, डिकॉक आणि मिलरला भारतीय फिरकीला खेळायचा पुरेसा अनुभव आहे. द. आफ्रिकन संघाची खरी ताकद त्यांच्या गोलंदाजीत आहे. रबाडा, यानसन सोबत केशव महाराज आणि तबरेझ शम्सीची फिरकी जोडी संघासाठी योग्य काम करत आली आहे. भारतीय फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांना योग्य प्रकारे हाताळले, तर यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. गोलंदाजी करताना धावा रोखण्यापेक्षा फलंदाजांना बाद करायचा विचार जास्त कामी आला आहे.

केन्सींग्टन ओव्हल मैदानावरच्या कर्मचाऱ्यांना अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी तयार करायला पुरेसा वेळ मिळाला आहे. गवताचा हिरवा रंग अंतिम सामन्याच्या खेळपट्टीवर दिसणार नाही. भरपूर पाणी मारून रोलींग केल्याने खेळपट्टी टी-२० सामन्यासाठी चांगली असल्याचा निर्वाळा संयोजकांकडून दिला गेला आहे. अंतिम सामन्याला आयसीसीचे पदाधिकारी, विविध देशांच्या क्रिकेट मंडळाचे अधिकारी आणि प्रायोजकांची रेलचेल असेल, ज्यात विंडीज क्रिकेटचे माजी महान खेळाडूही हजर राहणार आहेत.

विश्रांतीला वेळ कमी मिळाला

द. आफ्रिकन संघाचा उपांत्य सामना बुधवारी रात्री झाला आणि भारतीय संघाचा गुरुवारी सकाळी. सामना संपवून दक्षिण आफ्रिकन संघ गुरुवारी बार्बाडोसला येऊन धडकला. भारतीय संघाला उपांत्य सामना संपवून बार्बाडोसला यायला गुरुवारची रात्र झाली. अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी द. आफ्रिकन संघाने सराव केला, तर भारतीय संघाने विश्रांतीला कमी वेळ मिळाल्याने सराव न करणे पसंत केले. इंग्लंडसमोरचा सामना मनातून मागे टाकून योग्य विश्रांती मनाला, शरीराला देऊन शनिवारी ताज्या भावनेने अंतिम सामन्यात उतरायचे आव्हान भारतीय संघाला पेलायला लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : राहुल गांधी कोल्हापूरमध्ये दाखल

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT