T20 World Cup 2024 Prize Money
T20 World Cup 2024 Prize Money esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 Prize Money : विजेत्या टीम इंडियासह सर्व 20 संघ मालामाल; जाणून घ्या कोणाला किती मिळाली बक्षीस रक्कम

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Prize Money : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे.

जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघावर पैसांचा पाऊस पडला आहे, आयसीसीने या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 93.51 कोटी रुपये (11.25 दशलक्ष अमेरिकन डॉलर) एवढी बक्षीस रक्कम ठेवली आहे, जो एक विक्रम आहे. हे मागील सर्व आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील बक्षीस रकमेचे बजेट 82.93 कोटी रुपये (10 दशलक्ष अमेरिकन डॉलर) होते.

पुरस्कार आणि बक्षीस

विजेता संघ- २०.३७ कोटी

उपविजेता संघ- १०.६४ कोटी

स्मार्ट कॅच ऑफ द मॅच- ३००० डॉलर ( सूर्यकुमार यादव)

प्लेअर ऑफ द मॅच- ५००० डॉलर ( विराट कोहली)

प्लेअर ऑफ द सिरिज- १५००० डॉलर ( जसप्रित बुमराह)

प्लेअर ऑफ द मॅच- ५००० डॉलर ( विराट कोहली)

कोणत्या फेरीत किती पैसे दिले जातील :

  • विजेता रु. 20.36 कोटी (US$2.45 दशलक्ष)

  • उपविजेते रुपये 10.64 कोटी (US$1.28 दशलक्ष)

  • उपांत्य फेरीत पराभूत झाल्याबद्दल रु. 6.54 कोटी (US$787,500).

  • सुपर-8 फेरीतून बाहेर पडल्यास रु. 3.17 कोटी (US$ 382,500)

  • 9व्या ते 12व्या स्थानासाठी रु. 2.05 कोटी (US$247,500)

  • 13व्या ते 20व्या स्थानासाठी रु. 1.87 कोटी (US$225,000)

विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?

चॅम्पियन टीम इंडियाला 20.36 कोटी रुपये (2.45 दशलक्ष अमेरिकन डॉलर) मिळाले आहे. यापूर्वीच्या कोणत्याही टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजेत्या संघाला इतके पैसे मिळाले नव्हते. यावर्षी या स्पर्धेत विक्रमी 20 संघ खेळत आहेत. त्यामुळे याला आतापर्यंतचा सर्वात मोठा टी-20 वर्ल्ड कप म्हटले जात आहे.

त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत झालेल्या दक्षिम आफ्रिका संघाला 10.64 कोटी (US$1.28 दशलक्ष) वर समाधान मानावे लागेल.

उपांत्य फेरी खेळल्यानंतर बाहेर पडलेल्या अफगाणिस्तान आणि इंग्लंड संघांना 6.54 कोटी रुपये (787,500 यूएस डॉलर) मिळतील.

सुपर-8 फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघांवरही पैशांचा पाऊस

जे संघ दुसरी फेरी म्हणजेच सुपर-8 फेरी पार करण्यात अपयशी ठरतील त्यांना 3.17 कोटी रुपये (382,500 US डॉलर) मिळतील. त्याच वेळी, 9व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.05 कोटी रुपये (247,500 यूएस डॉलर) मिळतील. 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या प्रत्येक संघाला 1.87 कोटी रुपये (US$225,000) मिळतील. याशिवाय स्पर्धेतील एक सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला अतिरिक्त 25.89 लाख रुपये (31,154 यूएस डॉलर) दिले जातील. यात उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा समावेश नाही. हा नियम सुपर-8 फेरीपर्यंत लागू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : ''सरकार लवकरच 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करणार'' चंद्रकांत पाटलांचा शब्द...

Manisha Koirala : "मी कायमच चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात पडले" ; अखेर रिलेशनशिप बाबत मनीषा कोईरालाने दिली कबुली

Accidental Death: 'त्या' अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू!

IND vs ZIM: भारताच्या 113 पैकी तब्बल 20 खेळाडूंचं T20I पदार्पण झिम्बाब्वेविरुद्ध, विराट-सॅमसनचाही समावेश; पाहा लिस्ट

Milk Rate : 'दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव द्या, अन्यथा गाई-म्हशींसह मंत्रालयासमोर आंदोलन करणार'; शिवसेनेचा इशारा

SCROLL FOR NEXT