Suryakumar Yadav Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs BAN: सूर्यकुमार आला, सिक्स मारला अन् आऊट झाला, पाहा कशी गमावली विकेट

Pranali Kodre

T20World Cup 2024, India vs Bangladesh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर-8 फेरीतील सामना शनिवारी (22 जून) झाला. अँटिग्वामधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 20 षटकात 6 बाद 196 धावा केल्या.

भारताकडून फलंदाजी करताना जवळपास फलंदाजीला आलेल्या सर्वच फलंदाजांनी छोटेखानी पण आक्रमक खेळी केल्या. मात्र, या सामन्यात सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. त्याच्या विकेटची सध्या चर्चा आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली होती. मात्र रोहित चौथ्या षटकात 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्यानंतरही विराटने ऋषभ पंतला साथीला घेत डाव पुढे नेला.

मात्र, 9 व्या षटकात तान्झिम हसन साकिब गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच चेंडूवर विराटला 37 धावांवर बाद केले. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरला. त्याने फलंदाजीला आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर साकिबविरुद्ध खणखणीत षटकार मारला.

मात्र त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. उसळी घेतलेल्या चेंडूवर सूर्यकुमार गोंधळला आणि त्याच्या बॅटच्या कडाचा स्पर्श चेंडूला झाला. तो चेंडू यष्टीरक्षक लिटन दासने झेलला. त्यामुळे सूर्यकुमारला 6 धावांवर बाद व्हावे लागले.

दरम्यान, सूर्यकुमार बाद झाल्यानंतरही पंतने आक्रमक 36 धावांची खेळी केली. तर नंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या आक्रमणामुळे भारताने 196 धावांचा टप्पा गाठला. हार्दिकने 27 चेंडूत 50 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच शिवम दुबेने 24 चेंडूत 3 षटकारांसह 34 धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून गोलंदाजीत तान्झिम हसन साकिब आणि रिषाद हुसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT