T20 World Cup 2024 Final, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होत आहे. बार्बाडोसला होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरला.
भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच षटकात आक्रमक पवित्रा त्यांनी अवलंबला होता. मात्र, दुसऱ्या षटकात भारताला मोठे धक्के बसले. दक्षिण आफ्रिकेकडून दुसरे षटक टाकण्यासाठी केशव महाराज आला.
भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना केशव महाराजने दुसऱ्या षटकात बाद केलं.
केशव महाराज पहिल्या दोन चेंडूवर रोहितने सलग दोन चौकार मारले. त्यानंतर महाराजने चांगले पुनरागमन केले. त्याने चौथ्या चेंडूवर रोहितला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. रोहितचा झेल हेन्रिक क्लासेनने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घेतला. त्यामुळे रोहितला ९ धावांवर बाद व्हावे लागले.
त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत उतरला. मात्र त्यालाही फार वेळ महाराजने टिकू दिले नाही. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंतने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चूकला आणि चेंडू त्याच्या बॅटला लागून वर उडाला. त्यामुळे त्याचा सोपा झेल यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने घेतला. पंतला एकही धाव करता आली नाही.
इतकेच नाही, तर पाचव्या षटकात कागिसो रबाडाने सूर्यकुमार यादवला ३ धावांवर बाद केले. त्याचाही झेल क्लासेनने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घेतला. त्यामुळे ३४ चेंडूत ३ बाद अशी भारताची अवस्था होती.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेंड्रिक्स, एडेन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सिन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्किया, तब्राईझ शाम्सी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.