USA vs India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs USA: भारतासमोर पाकिस्तानला नमवणाऱ्या अमेरिकेचं आव्हान! कधी अन् कसा पाहाणार सामना, अंपायर कोण? जाणून घ्या डिटेल्स

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अमेरिका संघात बुधवारी सामना होणार असून या सामन्याबद्दलचे डिटेल्स जाणून घ्या.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs USA: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बुधवारी 25 वा सामना भारत आणि यजमान अमेरिका संघात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचा हा या स्पर्धेतील हा तिसरा सामना आहे.

भारतीय संघाने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आयर्लंडला 8 विकेट्सने पराभूत केले होते. तसेच दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 धावांनी मात दिली. तसेच अमेरिका संघाने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात कॅनडाला 7 विकेट्सने पराभूत केले होते, तसेच दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते.

आता बुधवारी भारत आणि अमेरिका हे दोन्ही अपराजित संघ आमने-सामने येत आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांपैकी कोणता संघ आपली विजयी लय कायम राखणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान भारत आणि अमेरिका या संघात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील हा इतिहासातील पहिलाच सामना आहे. यापूर्वी हे दोन संघ आमने-सामने आलेले नाहीत.

अंपायर्स कोण असणार?

बुधवारी होणाऱ्या सामन्यासाठी पॉल रायफेल आणि कुमार धर्मसेना हे मैदानावर पंच म्हणून काम पाहाणार आहेत. तसेच सॅम नोगाज्स्की टीव्ही अंपायर असलील, तर ऍड्रियन होल्डस्टोक फोर्थ अंपायर असणार आहेत. रंजन मदुगाल सामनाधिकारी असणार आहेत.

दरम्यान आता भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहता येईल हे जाणून घेऊया.

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना 12 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना किती वाजता सुरु होणार?

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार असून त्यापूर्वी 7.30 वाजता नाणेफेक होईल.

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्याचे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

असे आहेत संघ

  • भारत - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • अमेरिका - स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (यष्टीरक्षक/कर्णधार), अँड्रिज गॉस, ऍरोन जोन्स, नितीश कुमार, कोरे अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, अली खान, निसर्ग पटेल, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शेडली व्हॅन शाल्कविक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT