Rohit Sharma | Rishabh Pant Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: तुच घे बाबा! ऋषभ पंत कॅच घेत असताना कर्णधार रोहितने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन, ICC ने शेअर केला Video

Rohit Sharma - Rishabh Pant: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान संघात झालेल्या सामन्यात ऋषभ पंत एक कॅच घेत असताना रोहित शर्माने त्याला गमतीशीर प्रतिक्रिया दिली होती, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान संघात गुरुवारी (20 जून) सुपर-8 सामना पार पडला. बार्बाडोसला झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 47 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात एक गमतीशीर घटनाही घडली.

झाले असे की भारताने अफगाणिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अफगाणिस्तानने चांगल्या सुरुवातीनंतर मात्र नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. यावेळी 11 व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजीसाठी आला.

त्यावेळी अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि अझमतुल्लाह ओमरझाई फलंदाजी करत होते. कुलदीपने या षटकातील दुसरा चेंडू गुगली टाकला. त्यावर गुलबदिन शॉट खेळण्यासाठी चूकला आणि चेंडू त्याच्या बॅटवर लागून वर उंच उडाला.

यावेळी यष्टीरक्षण करणाऱ्या पंत मी झेल घेतो म्हणून ओरडत पळला. त्यावेळी चेंडू झेलण्याची संधी रोहितकडेही होती, कारण तोही जवळच होता. मात्र, पंतने आवाज दिल्याने त्याने तो चेंडू झेलला. पण पंतचा झेल घेण्यासाठीचा एकूण उत्साह पाहुन रोहितने गमतीशीर प्रतिक्रिया दिली. त्याने तूच घे अशा प्रकारचे हावभाव पंतने झेल घेतल्यानंतर केले.

त्यावेळी पंतने झेललेला चेंडू त्याच्याकडे फेकलाही, पण रोहितने तो मस्करीत घेतला नाही. यानंतर भारतीय संघाने विकेट मिळाल्याचे सेलीब्रेशन केले. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 181 धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने 53 धावांची खेळी केली, तर हार्दिक पांड्याने 32 धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत कर्णधार राशिद खान आणि फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच नवीन-उल-हकने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 षटकात सर्वबाद 134 धावा करता आल्या.अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला ओमरझाईने सर्वाधिक 26 धावा केल्या. त्याच्याशिवाय कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: आज मतदान! प्रत्येक क्षणाची अपडेट वाचा एका क्लिकवर

Panchang 20 November: आजच्या दिवशी विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा

केंद्रांवरील हालचालींवर पोलिसांच्या ड्रोन अन्‌ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष! सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 11000 पोलिसांचा बंदोबस्त, चहा-नाष्टा, जेवण जागेवरच

आजचे राशिभविष्य - 20 नोव्हेंबर 2024

घरबसल्या शोधा मतदार यादीत तुमचे नाव! नाव शोधण्यासाठी ‘हे’ ३ पर्याय; आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ; मतदान कार्ड नसेल तरी करता येईल मतदान, वाचा...

SCROLL FOR NEXT