Virat Kohli | Yashasvi Jaiswal X/BCCI
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: भारताच्या पहिल्याच सुपर-8 सामन्यात येणार पावसाचा अडथळा? पाहा काय आहेत हवामान अंदाज

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान संघात गुरुवारी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर-8 सामन्यावेळी हवामान अंदाज कसे आहेत, जाणून घ्या.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सुपर-8 फेरी सुरू झाली आहे. या फेरीतील भारताचा पहिला सामना गुरुवारी (20 जून) अफगाणिस्तान विरुद्ध पार पडणार आहे. हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंगटन ओव्हल, ब्रिजटाऊन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळे नुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतील अनेक सामनेही रद्द करावे लागले आहेत.

त्यातच आता सुपर-8 फेरी सुरू झाली असल्याने प्रत्येक सामना महत्त्वाचा असून आव्हानही कठीण झाले आहे. अशाच भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यातही पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

तर, बार्बाडोसमध्येही गुरुवारी ढगाळ वातावर असणार आहे. दरम्यान, Accuweatherच्या अंदाजानुसार सामन्याच्या वेळी जरी हवामान ढगाळ असले, तरी पावसाची शक्यता खूप कमी आहे.

तसेच अगदीच पाऊस आला, तरी त्याचा फारवेळ अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. तथापि, हा सामना रद्द होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. अगदीच पाऊस झाला, तर षटके कमी केली जाऊ शकतात.

आमने-सामने आकडेवारी

भारत आणि अफगाणिस्तान संघात आत्तापर्यंत टी20 मध्ये 8 सामने खेळववण्यात आले आहेत. यामध्ये 7 सामने भारताने जिंकले आहेत, तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

असे आहेत संघ -

  • भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल

  • अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, मोहम्मद इशाक, नांगेलिया खरोटे, हजरतुल्ला झाझाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT