India vs Afghanistan Playing-11 : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. अफगाणिस्तान संघ ग्रुप स्टेजमध्ये ज्या प्रकार खेळला आहे, ते पाहता त्यांना अजिबात हलके घेता येणार नाही. त्यामुळे या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा एका खेळाडूला संधी देऊ शकतो, जो अफगाणिस्तान विरुद्ध एक्स फॅक्टर सिद्ध होऊ शकतो. आतापर्यंत ज्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालला संधी मिळाली पाहिजे. याचे कारण विराट कोहली आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून फ्लॉप ठरला आहे. त्याच्या तीन सामन्यांच्या धावा एकत्र केल्या तर 10 धावाही पूर्ण होत नाहीत. आयसीसी स्पर्धांमध्ये विराट कोहली सलग तीन सामन्यांमध्ये फ्लॉप होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वालला संधी मिळायला हवी. जैस्वालला खेळवल्यास तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टरही ठरू शकतो. याचे कारण असे की तो डावखुरा आहे आणि टीम कॉम्बिनेशन चांगले होईल. याशिवाय जैस्वाल केवळ पॉवरप्लेमध्ये आक्रमण करून जास्तीत जास्त धावा करू शकतो.
अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि डावखुरा यशस्वी जैस्वाल त्याच्याशी सामना करण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. विराट कोहली डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळेच यशस्वी जैस्वाल खूप प्रभावी ठरू शकतात आणि बार्बाडोसच्या या खेळपट्टीवर तो फॅक्टर ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.