Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: अमेरिकेतील मॅच पावसामुळे झाल्यात रद्द, भारत-बांगलादेश सराव सामन्यावेळी कसे असेल हवामान?

Pranali Kodre

India vs Bangladesh, New York Weather: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा स्थानिक वेळेनुसार 1 जूनला, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार 2 जूनला सुरु होणार आहे. दरम्यान, सध्या सराव सामने सुरू आहेत. भारताचा सराव सामना 1 जून रोजी खेळवला जाणार आहे.

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध न्युयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सराव सामना खेळणार आहे. हे न्युयॉर्कमधील नव्याने बांधण्यात आलेले स्टेडियमवर असून यावरच भारताचे स्पर्धेतील पहिल्या फेरीतील तीन सामने होणार आहेत.

तथापि, सध्या अमेरिकेत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. पावसामुळे चार सराव सामनेही रद्द करण्यात आले. त्याचमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्यावेळी हवामान कसे असेल, याबद्दल अनेकांना प्रश्न पडला असेल.

दरम्यान, 1 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. आकाश बहुतांशी निरभ्र राहण्याची शक्यता आहे. AccuWeather च्या रिपोर्ट्सनुसार सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता नाही. तसेच 1 जूनला दिवसा तापमान साधारण 28 डिग्री सेल्सियसपर्यंत असू शकते, तर रात्री 17 डिग्री सेल्सियस असेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना स्थानिक वेळानुसार सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे, म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे या सामन्यावेळीही पावसाची शक्यता नसून तापमान साधारण 21 ते 26 डिग्री सेल्सियस दरम्यान असू शकते.

कुठे पाहाता येणार सामना?

भारत आणि बांगलादेश हा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित होईल, तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा सामना प्रक्षेपित केला जाणार आहे.

भारताचे सामने

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध भारताला सामना खेळायचा असून 12 जूनला अमेरिकेविरुद्ध सामना होईल. पहिल्या फेरीतील भारताचा शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टी-20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तांझिद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान. शोरुफुल इस्लाम, तंजीम हसन साकीब.

  • राखीव खेळाडू : अफिफ हुसेन, हसन महमूद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT