Virat Kohli, Rohit Sharma, Babar Azam Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: विराट, रोहित अन् बाबरमध्ये कडवी टक्कर, IND vs PAK सामन्यादरम्यान तिघांमध्ये अव्वल क्रमांकासाठी रस्सीखेच

Virat Kohli, Rohit Sharma, Babar Azam: रविवारी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान विराट कोहली, रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्यातही एका वैयक्तिक विक्रमासाठी शर्यत असणार आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Pakistan: टी20 वर्ल्ड कप 2024 मधील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (9 जून) खेळवला जाणार आहे. हा सामना न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता चालू होईल.

या सामन्यादरम्यान विराट कोहली, रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्यातही वैयक्तिकरित्या एका विक्रमासाठी शर्यत असणार आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंमध्ये हे तिघेही आहेत. महत्त्वाचे म्हणजे या तिघांच्याही धावांमध्ये फारसा फरक नाही. त्याचमुळे या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी तिघांमध्येही शर्यत असेल.

सध्या म्हणजेच 8 जून 2024 पर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 120 सामन्यांमध्ये 4067 धावा केल्या आहेत, तर विराट 4038 धावांवर दुसऱ्या आणि 4026 धावांसह रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या तिघांव्यतिरिक्त कोणालाही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 8 जून 2024 पर्यंत)

  • 4067 धावा - बाबर आझम (120 सामने)

  • 4038 धावा - विराट कोहली (118 सामने)

  • 4026 धावा - रोहित शर्मा (152 सामने)

  • 3600 धावा - पॉल स्टर्लिंग (144 सामने)

  • 3531 धावा - मार्टिन गप्टील (122 सामने)

भारत - पाकिस्तान संघात काट्याची टक्कर

भारत आणि पाकिस्तान संघासाठी रविवारी होणारा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडला पराभूत केले आहे, तर पाकिस्तानला मात्र पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल, तर पाकिस्तान संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्न करेल.

भारत आणि पाकिस्तान संघात टी20 वर्ल्ड कपमध्ये होणारा हा आठवा सामना आहे. याआधी झालेल्या 7 सामन्यांपैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत, तर 1 सामना पाकिस्तानने जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT