T20 World Cup 2024 | Semi-Final Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: आता रंगणार सेमीफायनलचा थरार! कोणाची गाठ कोणाशी, जाणून घ्या शेड्युल

T20 World Cup 2024, Semi-Final Schedule: टी20 वर्ल्ड कपमधील अंतिम 4 संघ निश्चित झाले असून आता कोणत्या संघाचा सामना कोणाशी कुठे आणि कधी होणार आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, Semi-Final Schedule: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवण्यात आलेली ही स्पर्धा अनेक गोष्टींमुळे ऐतिहासिक ठरली. यंदा पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले होते.

त्यामुळे अनेक धक्कादायक निकालही या स्पर्धेत पाहायला मिळाले, तर बऱ्याच बलाढ्य संघाचे आव्हानही लवकर संपले, याच पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा काही संघांचा समावेश आहे.

दरम्यान आता या स्पर्धेतील अंतिम 4 संघ मिळाले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत.

उपांत्य फेरीतील संघांची कामगिरी

उपांत्य फेरीत पोहचलेल्या चार संघांपैकी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आत्तापर्यंत अपराजित आहेत.

भारताने पहिल्या फेरीत तीन सामने जिंकले होते, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर सुपर-8 मधील तिन्ही सामने भारताने जिंकले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या फेरीतील चार आणि सुपर-8 फेरीतील तीन असे सलग 7 सामने जिंकले आहेत.

लढवय्या अफगाणिस्तान अनेक मोठ्या संघांना पाणी पाजत पहिलांदाच सेमीफायनल गाठली आहे. अफगाणिस्तानने पहिल्या फेरीत तीन विजय आणि एक पराभव पाहिला होता, तसेच सुपर-8 फेरीत तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले, तर एक पराभव स्विकारला.

गतविजेत्या इंग्लंडनेही सुरुवातीच्या संघर्षानंतर चांगली लय पकडली आहे. इंग्लंडने पहिल्या फेरीत चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात पराभव स्विकारला. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला. सुपर-8 फेरीत इंग्लंडने तीन सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आणि 1 सामना पराभूत झाला.

अशी रंगणार उपांत्य फेरी

दरम्यान आता या स्पर्धेतील अंतिम 4 संघ निश्चित झाल्याने उपांत्य फेरीत कसे सामने होणार हे देखील स्पष्ट झाले आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तौरोबाला होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी पहाटे 6 वाजता सुरू होणार आहे.

दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात गयानाला रंगेल. हा सामनाही गुरुवारीच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.

आता या उपांत्य फेरीत विजय मिळवत कोणते दोन संघ अंतिम सामना गाठणार हे पाहाणं रंजक ठरणार आहे. अंतिम सामना शनिवारी होणार आहे.

बाद फेरीचे वेळापत्रक

उपांत्य फेरी

  • 27 जून - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तौरोबा (वेळ - पहाटे 6.00 वाजता)

  • 27 जून - भारत विरुद्ध इंग्लंड, गयाना (वेळ - रात्री 8.00 वाजता)

अंतिम सामना

  • 29 जून - बार्बाडोस, रात्री. 8.00 वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT