T20 World Cup 2024 | South Africa vs Afghanistan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: कोण इतिहास रचणार? द. आफ्रिका-अफगाणिस्तान संघात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी चुरस

South Africa vs Afghanistan: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळवला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2024, South Africa vs Afghanistan: एकीकडे कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या अफगाणिस्तानने टी-२० विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर दुसरीकडे आयसीसी स्पर्धांच्या अजिंक्यपदाची वारंवार हुलकावणी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकन संघानेही अंतिम चार फेरीत पाऊल ठेवले.

या दोन्ही देशांना अद्याप टी-२० विश्‍वकरंडकाच्या फायनलमध्ये धडक मारता आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर कोणता संघ टी-२० विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाच्या लढतीत प्रवेश करीत इतिहास रचतोय, याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

अफगाणिस्तानच्या संघाने मागील वर्षी (२०२३) भारतामध्ये झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात इंग्लंड, पाकिस्तान व श्रीलंका या तीन कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या बलाढ्य देशांना पराभूत करीत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला.

याच अफगाणिस्तानने वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्‍वकरंडकात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व बांगलादेश या संघांना नमवत चक्क उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्वबळावर, कर्तृत्वावर अंतिम चारमध्ये पोहोचलेल्या अफगाणिस्तानी संघाला कमी लेखण्याची चूक दक्षिण आफ्रिकन संघ यावेळी करणार नाही.

गुरबाज, फारूकी सर्वोत्तम

अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंनी टी-२० विश्‍वकरंडकात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. फलंदाजीत रहमानुल्ला गुरबाज व गोलंदाजीत फझलहक फारूकी यांनी देदीप्यमान कामगिरी करताना अफगाणिस्तानच्या भरारीत मोलाचा वाटा उचलला आहे.

गुरबाजने ४०.१४ च्या सरासरीने २८१ धावांची फटकेबाजी केली असून फारूकीने १६ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

कर्णधार राशीदचा आत्मविश्‍वास

अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान याने स्वत: मैदानात चमकदार खेळ करीत अफगाणिस्तानी संघातील इतर खेळाडूंसमोर आदर्श उभा केला आहे. राशीद खानने १४ विकेट मिळवल्या असून निर्णायक क्षणी मोलाच्या धावाही केलेल्या आहेत. राशीद खानचा आत्मविश्‍वास सध्या गगनाला भिडला आहे.

अफगाणिस्तानचा सामना करताना दक्षिण आफ्रिकन संघाला सावध पावले उचलावी लागणार आहेत. राशीद खानसह गुलबदीन नईब, नवीन उल हक, मोहम्मद नबी या खेळाडूंच्या कामगिरीवरही अफगाणिस्तानचे लढतीमधील भवितव्य अवलंबून असणार आहे.

इतिहास मार्करम सेनेच्या बाजूने

दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत दोन टी-२० लढती पार पडल्या आहेत. या दोन्ही लढतींमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे.

इतिहास जरी एडन मार्करमच्या दक्षिण आफ्रिकन संघाच्या बाजूने असला तरी वर्तमानात अफगाणिस्तानचा संघ जबरदस्त खेळ करीत आहे. त्यामुळे दोन देशांमध्ये उद्या (ता. २७) काँटे की टक्कर पहायला मिळेल यात शंका नाही.

चोकर्सचा शिक्का पुसणार?

दक्षिण आफ्रिकन संघाला ‘चोकर्स’ म्हणून संबोधले जाते. आयसीसीच्या स्पर्धांच्या जेतेपदापासून हा संघ सातत्याने दूर राहिला आहे. विश्‍वकरंडकाच्या निर्णायक लढतींमध्ये हा संघ ढेपाळतो. दबावाखाली गळपटतो. त्यामुळे त्यांच्यावर ‘चोकर्स’चा शिक्का लावण्यात आला आहे.

एडन मार्करमच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण आफ्रिकन संघ उपांत्य फेरीचा अडथळा पहिल्यांदा ओलांडणार का, असा प्रश्‍न याप्रसंगी निर्माण झाला आहे.

डी कॉक, क्लासेन, मिलरवर मदार

दक्षिण आफ्रिकन संघाची फलंदाजीची मदार क्विंटॉन डी कॉक, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्सवर असणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत त्यांचा पराभव झालेला नाही. ही जमेची बाजू असली तरी त्यांना सहजसोपे विजय मिळवता आलेले नाहीत.

कडव्या संघर्षानंतर त्यांचा संघ विजयी ठरला आहे. कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमॅन या गोलंदाजांना अफगाणच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT