T20 world cup 2024 USA VS South Africa sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 USA VS South Africa : आजपासून रंगणार ‘सुपर-8’चा थरार! अमेरिकेच्या रडारवर आता दक्षिण आफ्रिका

Kiran Mahanavar

T20 world cup 2024 USA VS South Africa ­­: टी-२० विश्‍वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या अमेरिकन संघाच्या रडारवर दक्षिण आफ्रिकन संघ असणार आहे.

अमेरिकन-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज (ता. १९) ‘सुपर-आठ’ गट दोन फेरीची लढत रंगणार आहे. एडन मार्करम, क्विंटॉन डी कॉक या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा लढतीत कस लागणार असून अमेरिकन संघाला कर्णधार मोनांक पटेलच्या तंदुरुस्तीची चिंता सतावत आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाचा साखळी फेरीमध्ये ड गटामध्ये समावेश होता. या गटातील चारही लढतींमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय संपादन करीत आठ गुणांसह पहिले स्थान पटकावले, मात्र यापैकी एकाही लढतीत त्यांना १२०च्या वर धावा करता आल्या नाहीत. यापैकी तीन लढती अमेरिकेत होत्या. एक लढत वेस्ट इंडीजमध्ये पार पडली. अमेरिकेतील लढतींमध्ये धावा करताना फलंदाजांची दमछाक उडाली हे मान्य आहे, पण तरीही दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा अमेरिकन संघाविरुद्धच्या लढतीमध्ये कस लागणार आहे. यापुढील सर्व लढती वेस्ट इंडीजमध्ये होणार आहेत. ही फलंदाजांसाठी दिलासा देणारी बाब असेल.

डेव्हिड मिलर (१०१ धावा), ट्रिस्टन स्टब्स (७३ धावा), हेनरिक क्लासेन (७२ धावा) या तीनही फलंदाजांनी निर्णायक क्षणी चमकदार खेळ करून दाखवला आहे, पण एडन मार्करम, क्विंटॉन डी कॉक व रिझा हेंड्रिक्स यांच्याकडून दबावाखाली खेळ उंचावण्याच्या आशा आहेत. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये कात टाकली आहे. कागिसो रबाडा, ओटनिल बार्टमॅन, मार्को यान्सेन व केशव महाराज यांनी ठसा उमटवला आहे. ॲनरिक नॉर्किया याच्याकडून आयपीएलमध्ये सुमार कामगिरी झाली, पण या स्पर्धेत त्याने झोकात पुनरागमन केले. त्याने नऊ फलंदाज बाद केले असून बार्टमन, महाराज यांनी प्रत्येकी पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

अमेरिका आता वेस्ट इंडीजमध्ये खेळणार

अमेरिकन संघाने साखळी फेरीच्या चारही लढती स्वत:च्या घरामध्ये अर्थातच अमेरिकेमध्ये खेळल्या. तेथील वातावरण व खेळपट्टी यांच्याशी योग्य सांगड घालत त्यांनी पुढल्या फेरीत वाटचाल केली. आता ‘सुपर-आठ’ फेरीमधील सर्व लढती त्यांना वेस्ट इंडीजमध्ये खेळावयाच्या आहेत. तेथील खेळपट्ट्यांवर ते प्रथमच खेळणार आहेत. यामुळे त्यांच्यासाठीही हे नवे आव्हान असणार आहे. या संघात आठ भारतीय वंशाचे, दोन पाकिस्तानी वंशाचे खेळाडू असून एक न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्‌स येथील खेळाडू आहेत.

जोन्स, नेत्रावळकर, गौसवर मदार

मोनांक पटेलच्या तंदुरुस्तीवर अमेरिकन संघ व्यवस्थापनाच्या नजरा आहेत, पण सध्या तरी अमेरिकन संघाची मदार पर्यायी कर्णधार ॲरोन जोन्स, अँड्रीस गौस व सौरभ नेत्रावळकर यांच्या खेळावर असणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघाला अमेरिकन संघ रोखतोय का, हे पाहणे रंजक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT