T20 World Cup 2024 Wasim Akram criticises Pakistan sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : "बाबर आझमची पाकिस्तान टीम...", अमेरिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर संतापले दिग्गज

Kiran Mahanavar

अमेरिकन क्रिकेट संघाकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेलेल्या पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर महान कर्णधार व गोलंदाज वासीम अक्रम यांनी कडाडून टीका केली. जय-पराजय हा खेळाचा एक भाग असतो. मात्र अखेरच्या चेंडूपर्यंत लढत राहायला हवे. बाबरच्या पाकिस्तानी संघाकडून लज्जास्पद कामगिरी झाली. त्यांच्याकडून झुंज देण्याचा प्रयत्नच करण्यात आला नाही.

वासीम अक्रम यांनी पाकिस्तानी खेळाडूंची कानउघाडणी करताना म्हटले की, अमेरिकेने पहिल्या काही षटकांमध्ये विकेट घेऊन पाकिस्तानचा पाय खोलात नेला. लढतीला कलाटणी येथेच मिळाली. बाबर आझम व शादाब खान यांनी थोडीफार भागीदारी केली, पण पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. एकूणच काय तर सर्वच बाबींमध्ये पाक संघाकडून निराशा झाली. त्यांच्याकडून साधारण कामगिरी करण्यात आली.

अमेरिकन संघाचे कौतुक

वासीम अक्रम यांनी अमेरिकन संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. या वेळी ते म्हणाले, अमेरिकन संघाविरुद्धच्या लढतीत पाक संघ आरामात विजयी होईल असे वाटत होते. पाठीराख्यांनाही विजयाचा विश्‍वास होता. पाक संघाने प्रथम फलंदाजी केल्यानंतरही हा विश्‍वास कायम राहिला, पण अमेरिकन संघाने धावांचा यशस्वी पाठलाग केला. कर्णधार मोनांक पटेल याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अमेरिकन संघाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. वेल डन अमेरिका...

पाक संघाचा मार्ग खडतर

अमेरिकन संघाविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवानंतर आता पाकिस्तानी संघाचा पुढील फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर असणार आहे, असे वासीम अक्रम यांना वाटते. ते म्हणतात की, आता पाकिस्तानी संघासमोर बलाढ्य भारताचे आव्हान असणार आहे. त्यानंतर आयर्लंड व कॅनडा या संघांचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाकसाठी प्रत्येक लढत अटीतटीची असेल असेच म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT