India vs New Zealand, 28th Match Updates : India vs New Zealand, 28th Match, Updates : भारतीय संघाने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करत न्यूझीलंडने बाजी मारली. न्यूझीलंडच्या संघाने 8 गडी राखून विजय नोंदवत स्पर्धेतील आपले आव्हान भक्कम केले आहे. आघाडीच्या फलंदाजांनी भ्रम निरास केल्यानंतर अष्टपैलू जाडेजाने केलेल्या 19 चेंडूतील 26 धावांच्या मदतीने भारतीय संघाने कशीबशी शंभरी पार केली होती. निर्धारित 20 षटकात टीम इंडियाने 7 बाद 110 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघ मोठ्या बदलासह मैदानात उतरला आहे. इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. हार्दिक पांड्यालाही संघात कायम ठेवण्यात आले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत टीम इंडियाला सुरुवातीपासून धक्के दिले. ट्रेंट बोल्टने 3, ईश सोधीच्या 2 तर मिल्ने आणि साउदी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पाहा लाइव्ह अपडेट्स
96-2 : डॅरियल मिशेलच्या रुपात न्यूझीलंडन गमावली दुसरी विकेट, बुमराहलाच मिळाले यश
24-1 : मार्टिन गप्टिल 20 धावा करुन माघारी, बुमराहच्या गोलंदाजीवर शार्दुलनं टिपला कॅच
मार्टिन गप्टील आणि डॅरियल मिशेल जोडीनं केली न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात
94-7 : शार्दुल ठाकूरला बोल्टनं खातेही उघडू दिले नाही
94-6 : बोल्टने हार्दिक पांड्याला बाद करत टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. पांड्याने 24 चेंडूत 23 धावा केल्याय
70-5 : टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत , मिल्नेनं उडवल्या पंतच्या दांड्या
48-4 : सोधीनं विराट कोहलीलाही धाडले तंबूत, त्याने केवळ 9 धावांची भर घातली
40-3 : सोधीला उत्तुंग फटका मारण्याच्या नादात रोहितने गमावली विकेट, त्याने 14 चेंडूत 14 धावा केल्या
35-2 : लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला आणखी एक धक्का, साउदीला मिळालं यश. लोकेश राहुलनं 16 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या
11-1 : तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर बोल्टनं टीम इंडियाला दिला पहिला धक्का, इशान किशन 4 धावा करुन माघारी
भारताकडून लोकेश राहुल-इशान किशन तर न्यूझीलंडकडून बोल्टनं केली डावाला सुरुवात
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
India (Playing XI) : इशान किशन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती. जसप्रीत बुमराह.
New Zealand (Playing XI): मार्टिन गप्टिल, ड्रायल मिचेल, केन विल्यमसन (कर्णधार) जेम्स निशम, ड्वेन कॉन्वे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउदी, एडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.
टॉस जिंकून केन विल्यमसनने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.