T20 World Cup Ireland vs Netherlands 3rd Match Group A : कँफरची हॅटट्रिक आणि त्यानंतर ग्रेथ डेलन 44 (29) पॉल स्टर्लिंगच्या 30 (39)* ग्रेट इनिंगच्या जोरावर आयर्लंडनं विजयी सलामी दिली. सुपर -12 साठीच्या शर्यतीत त्यांनी ग्रुप अ मध्ये तगडी फाईट देण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. या गटात श्रीलंका, आयर्लंड, नामीबीया आणि नेदरलँड या संघांचा समावेश आहे.
नेदरलंडचा कर्णधार पीटर सीलरने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय फोल ठरला. पहिल्याच षटकात सलामीच्या जोडीत ताळमेळाचा अभाव दिसून आला. नेदरलंडने रन आउटच्या रुपात पहिली विकेट फेकली. सलामीवीर मॅक्स ओडाउटनं केलेल्या अर्धशतकाशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. त्याने 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. कर्णधार सीलरने त्याच्या खालोखाल 21 धावा केल्या. नेदरलंडने निर्धारित 20 षटकात सर्वबाद 106 धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवातही खराब झाली. संघाच्या धावफलकावर 27 धावा लागल्या असताना किवन ओब्रायन 9 धावा करुन तंबूत परतला. कर्णधार अँड्र्यू बायरनेही अवघ्या 8 धावांची भर घालून माघारी फिरला. त्यानंतर डेलने आणि पॉल स्टर्निंग जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. डेलने 44 धावांची खेळी माघारी फिरल्यानंतर सलामीवीर पॉल स्टर्लिंगने हॅटट्रिक मॅन कँफेरच्या साथीनं संघाला विजय नोंदवून दिला.
सुपर-12 राउंडमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी 8 संघ क्वॉलिफायर राउंडमध्ये भिडणार आहेत. ग्रुप अ मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नामीबीया आणि नेदरलँड या संघांचा समावेश आहे. तर ब गटात बांगलादेश, ओमान, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या दोन गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.