T20 World Cup Super 8 qualification scenarios of Group D sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup Super-8 : टी-20 वर्ल्ड कपचा रोमांच शिगेला, 'ग्रुप D'मध्ये मोठी उलथापालत; जाणून घ्या समीकरण... कोण आहे पुढे?

Kiran Mahanavar

T20 World Cup Super 8 qualification scenarios of Group D : श्रीलंका-नेपाळ यांच्यामधील टी-२० विश्‍वकरंडकातील ड गटातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. याचा फटका २०१४मध्ये टी-२० विश्‍वकरंडक पटकावणाऱ्या श्रीलंकन संघाला बसला. याचसोबत नेपाळ संघाचेही नुकसान झाले. दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे.

श्रीलंका व नेपाळ या दोन्ही संघांना ‘सुपर आठ’ फेरीमध्ये पोहोचण्याची अंधुकशी आशा आहे; पण यासाठी ड गटातील पुढील लढतींचे निकाल त्यांच्या बाजूने लागण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या तरी श्रीलंका व नेपाळ हे संघ जर तरच्या समीकरणावर अवलंबून राहणार आहेत. दोन देशांमधील ही लढत पावसामुळे रद्द झाली आणि यामुळे तीन विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिकन संघ अधिकृतपणे ‘सुपर आठ’ फेरीमध्ये पोहोचला.

दक्षिण आफ्रिकन संघ ड गटामध्ये सलग तीन विजयांसह एकूण सहा गुण मिळवून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेश व नेदरलँड्‌स या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली आहे; पण सरस नेट रनरेटच्या जोरावर बांगलादेशचा संघ दुसऱ्या स्थानावर असून नेदरलँड्‌सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. नेपाळ व श्रीलंकन संघांनी प्रत्येकी एक गुणांची कमाई केली असून नेपाळचा संघ चौथ्या व श्रीलंकन संघ पाचव्या स्थानावर आहे.

ड गटातील समीकरण

  • श्रीलंकन संघाने अद्याप एकही विजय मिळवलेला नाही; पण तरीही त्यांना ‘सुपर आठ’ फेरीमध्ये पोहोचण्याची संधी आहे. सर्वप्रथम त्यांना अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत नेदरलँड्‌स संघावर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

  • श्रीलंकन संघाला इतर लढतींच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेश-नेदरलँड्‌स यांच्यामधील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यास याचा फायदा श्रीलंकेला होणार आहे.

  • श्रीलंकेला आगेकूच करता यावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेने नेपाळला हरवणे गरजेचे आहे. तसेच नेपाळने बांगलादेशवर विजय मिळवणेही आवश्‍यक आहे.

  • दक्षिण आफ्रिकावगळता इतर सर्व संघांचे समान गुण झाल्यास ज्या संघाचा नेट रनरेट अधिक असेल त्या संघालाच घोडदौड करता येणार आहे.

  • दक्षिण आफ्रिकन संघाने ड गटातून ‘सुपर आठ’ फेरीमध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेश व नेदरलँड्‌स यांनी उर्वरित दोन्ही साखळी फेरीच्या लढती जिंकल्या तर त्यांचाही प्रवेश पक्का होणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका व नेपाळला पुढल्या फेरीत पोहोचता येणार नाही.

लॉडरहिलमधील लढतींवर पावसाचे सावट

श्रीलंका-नेपाळ यांच्यामधील लॉडरहिल येथे होणारी लढत पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकली नाही. आता आगामी दिवसांमध्ये येथे तीन लढती होणे अपेक्षित आहे. अमेरिका-आयर्लंड (१४ जून), भारत-कॅनडा (१५ जून) व आयर्लंड-पाकिस्तान (१६ जून) या तीन लढती लॉडरहिल येथे होणार आहेत; पण आगामी दिवसांमध्ये येथे पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या तीनही लढतींवर पावसाचे सावट असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solar Storm: गंभीर चेतावणी! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

SCROLL FOR NEXT