India vs England T20 World Cup Warm up Match : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सलामी देण्यापूर्वी विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी दुबईच्या मैदानात उतरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीच्या फलंदाजांना किरकोळ धावांत माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी कर्णधार विराट कोहलीचा निर्णय सार्थ ठरवला.
दुसरीकडे जॉनी बेअरट्रोनं संघाचा डाव सांभाळणारी खेळी केली. त्याने 36 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 धावा केल्या. तो मैदानात असताना इंग्लंडचा संघ सराव सामन्यात दोनशे पार धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण जसप्रित बुमराहने त्याच्या स्फोटक खेळीला ब्रेक लावला. 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडुवर बुमराहने त्याला एका परफेक्ट यॉर्कर चेंडूवर क्लिन बोल्ड केलं. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. बुमराहने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 26 धावा खर्च करुन ही एकमेव विकेट मिळवली. लिविंग स्टोनच्या 30 धावा आणि मोईन अलीनं 20 चेंडूत केलेल्या 43 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 188 धावांपर्यंत मजल मारली.
टी- 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 12 गटात इंग्लंडचा संघ अ गटात आहे. त्यांच्या व्यतिरिक्त या गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचा समावेश आहे. ग्रुप अ मधील पहिल्या स्थानावरील संघ आणि ब गटातील दुसऱ्या स्थानावरील दुसऱ्या स्थानावरील संघ याच गटात असेल.
दुसरीकडे भारताच्या ब गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान या चार संघासह ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ आणि अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ खेळताना दिसणार आहे. 23 आक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने सुपर 12 गटातील लढतींना सुरुवात होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.