Trent-Boult-New-Zealand 
क्रिकेट वर्ल्ड कप

NZ vs AFG: बोल्टचा भेदक मारा; न्यूझीलंडला १२५ धावांचे आव्हान

अफगाणिस्तानच्या २० षटकात ८ बाद १२४ धावा

विराज भागवत

अफगाणिस्तानच्या २० षटकात ८ बाद १२४ धावा

NZ vs AFG, T20 World Cup: वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ यांच्या बळावर न्यूझीलंडने अफगाणिस्तानला २० षटकात ८ बाद १२४ धावांवर रोखले. न्यूझीलंडला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी १२५ धावांचा यशस्वी पाठलाग करायचा आहे. (Trent Boult Superb Bowling restricts Afghanistan 124 runs against New Zealand)

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी केली. अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात केवळ १२४ धावांपर्यंत मजल मारली. हजरतुल्लाह झझाई (२), मोहम्मद शहजाद (४) आणि रहमानुल्लाह गुरबाज (६) यांनी निराशा केली. गुलबदीने नईबनेही (१५) वाईट कामगिरी केली. खालच्या फळीतही मोहम्मद नबी (१४), करीम जनत (२), राशिद खान (३) यांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. पण नजीबुल्लाह झादरान याने एका बाजून खिंड लढवली. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार खेचत ४८ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीच्या जोरावरच संघाने १२०चा आकडा पार केला.

ट्रेंट बोल्टने ४ षटकात १७ धावा देऊन सर्वाधिक ३ बळी टिपले. अनुभवी टीम सौदीने २ बळी टिपले. तर जिमी निशम, अडम मिल्न आणि इश सोढी या तिघांनी १-१ गडी बाद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT