India vs Australia | T20 World Cup
India vs Australia | T20 World Cup Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

प्रणाली कोद्रे

T20 World Cup 2024: वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे येत्या १ जूनपासून टी२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. आता अवधे दोन दिवस राहिलेल्या या स्पर्धेबद्दल क्रिकेट वर्तुळात मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहे.

अनेक आजी-माजी दिग्गजांनी या स्पर्धेबद्दल विविध मतं देखील मांडली आहेत. आता काही दिग्गज क्रिकेटपटूंनी अंतिम सामन्यापर्यंत कोणते दोन संघ पोहचू शकतात, याबाबत अंदाज वर्तवले आहेत.

स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक माजी क्रिकेटपटूंनी अंतिम सामना कोणत्या दोन संघात होऊ शकतो, याबद्दल मत व्यक्त केले आहे.

यातील बऱ्याच खेळाडूंनी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना होईल असे अंदाज व्यक्त केले आहेत. तसेच जवळपास सर्वच माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचेल, असे अंदाज व्यक्त केले आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसते की सुनील गावसकर, ब्रायन लारा, पॉल कॉलिंगवूड, ख्रिस मॉरिस, मॅथ्यु हेडन आणि एस श्रीसंत यांनी हे अंदाज व्यक्त केले आहेत.

अंतिम सामन्यात पोहचणाऱ्या संघांबद्दल दिग्गजांनी व्यक्त केलेले अंदाज

  • ब्रायन लारा - भारत आणि वेस्ट इंडिज

  • पॉल कॉलिंगवूड - इंग्लंड आणि वेस्ट इंडिज

  • सुनील गावसकर - भारत आणि ऑस्ट्रेलिया

  • मॅथ्यु हेडन - भारत आणि ऑस्ट्रेलिया

  • ख्रिस मॉरिस - दक्षिण आफ्रिका आणि भारत

  • एस श्रीसंत - भारत आणि ऑस्ट्रेलिया

श्रीसंतने हे अंदाज व्यक्त करताना असेही म्हटले की 'ऑस्ट्रेलियाला हरवून वनडे वर्ल्ड कपचा बदला पूर्ण करायचा.'

दरम्यान, यंदा टी20 वर्ल्ड कपचे नववे पर्व असणार आहे. यंदाच्या स्पर्धेत पहिल्या फेरीत 20 संघ सहभागी होणार आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच 20 संघ खेळणार आहेत. पहिल्या फेरीतील 20 संघांमधून 8 संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, भारतीय संघ पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या सर्वात पहिल्या पर्वाचे विजेते आहेत. पण 2007 नंतर भारताला अद्याप टी२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Sudha Murty: सुधा मूर्तींनी खासदार म्हणून पहिल्यांदाच केलं राज्यसभेत भाषण; सर्वत्र होतंय कौतुक

Babar Azam : आधी आर्मी ट्रेनिंग आता गादीवर डाईव्हची प्रॅक्टिस... पाकिस्तान संघाचा अजब सराव

Hemant Soren: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री; चंपई सोरेन यांनी दिला राजीनामा

Hardik Pandya : आता कोणी हार्दिकला ट्रोल करून दाखवाच.... भारताच्या माजी क्रिकेटपटूनं भारला सज्जड दम

SCROLL FOR NEXT