India Head Coach Update News sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

India Head Coach : गौतम गंभीर नाही तर.... MS धोनी होणार भारताचा मुख्य कोच? कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने केलं मोठं वक्तव्य

Kiran Mahanavar

India Head Coach Update News : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. या काळात गौतम गंभीरसह अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत, आणि गौतम गंभीरचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

संघाच्या मुख्य कोचच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी विराट कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया न्यूजच्या एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, मुख्य कोचसाठी महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम पर्याय आहे.

राजकुमार शर्मा म्हणाला की, जर एमएस धोनी निवृत्त झाला तर तो मुख्य प्रशिक्षकासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने खेळले आहेत आणि अनेक मोठ्या टूर्नामेंटमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

तो पुढे म्हणाला की, धोनीला ड्रेसिंग रुममध्ये अधिक सन्मान मिळेल. संघासाठी नियोजन करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे संघात सर्वात महत्त्वाचे असते. जेव्हा धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. त्या काळात या संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांसारखे मोठे खेळाडू होते. असे असतानाही धोनीने संघाला चांगलेच सांभाळले.

धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

2004 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या एमएस धोनने टीम इंडियासाठी 538 सामने खेळले आहेत. त्याने 90 कसोटी सामन्यांमध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतकांच्या मदतीने 4876 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतकांच्या मदतीने 10773 धावा आणि 98 टी-20 सामन्यांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT