Virat Kohli
Virat Kohli Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli: विराट टी20 वर्ल्ड कपसाठी अखेर अमेरिकेला रवाना, टीम इंडियाच्या सराव सामन्यात खेळणार?

प्रणाली कोद्रे

Virat Kohli departs for USA: वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे 1 ते 29 जून दरम्यान टी20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी होणारे सर्व संघ तिथे पोहचले असून सराव सामने खेळण्यात व्यस्त आहे. भारतीय संघही सध्या न्युयॉर्कमध्ये असून तयारी करत आहे.

दरम्यान, आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेला गुरुवारी (30 मे) रवाना झाला आहे. त्यामुळे तो आता लवकरच भारतीय संघाशी जोडला जाईल.

तो या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात सहभागी होणारा अखेरचा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी अन्य सर्व खेळाडू आधीच संघाशी जोडले गेले असून त्यांच्या सरावालही सुरुवात झाली आहे.

विराटने आयपीएल 2024 नंतर बीसीसीआयकडे छोट्या सुट्टीची मागणी केली असल्याचे रिपोर्ट्स समोर आले होते. त्यामुळेच तो भारतीय संघात कधी सामील होणार, याबाबत सांशकता होती. पण अखेर तो गुरुवारी अमेरिकेला रवाना झाला.

तथापि, विराट अमेरिकेला रवाना झाला असला, तरी तो मोठा प्रवास केल्यानंतर भारताच्या सराव सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. भारताला 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. हा सामना न्युयॉर्कला खेळवला जाणार आहे.

विराट आहे दमदार फॉर्ममध्ये

दरम्यान, विराटच्या नजीकच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले, तर तो दमदार लयीत खेळत आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 स्पर्धेत 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या होत्या.

यात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली. तो आयपीएल 2024 मधील सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटू ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court on NEET UG 2024: सर्वोच्च न्यायालयाने केलं मान्य.... NEET पेपर झाला लीक! पुन्हा परिक्षा घेण्यावर घेतला मोठा निर्णय

Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेचा आजचा दुसरा दिवस, जाणून घ्या मंदिराशी निगडीत 'ही' रहस्ये

Maharashtra Live News Updates : मनोज जरांगेंच ठिकठिकाणी जंगी स्वागत; जेसीबीतून केली पुष्पवृष्टी

Jay Shah: जगभरातील क्रिकेटची सूत्र येणार जय शाह यांच्या हाती? ICC अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार

Dharmveer 2: 'धर्मवीर २'च्या नव्या टीझरची सोशल मीडियावर चर्चा; पण नेटकऱ्यांनी पकडली व्हिडिओमधील मोठी चूक, तुम्हाला कळली का?

SCROLL FOR NEXT