टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने पाकिस्तान संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाही. आम्हाला आमच्या क्षमतेचा अंदाज आहे. चुकांमध्ये सुधारणा करुन दमदार कमबॅक करु, असा विश्वास विराट कोहलीने यावेळी व्यक्त केला.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच टीम इंडियाला धक्क्यावर धक्के दिले. रोहित शर्मा खातेही न उघडता माघारी फिरला. लोकेश राहुललाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. यासंदर्भातही विराट कोहलीने भाष्य केले. सुरुवातीच्या पडझडीतून सावरत आम्ही समाधानकारक धावसंख्या उभारली होती. पण 20-30 धावा कमी पडल्या. पहिल्या 6 षटकात झालेल्या चुका पराभवाला कारणीभूत ठरल्या. याशिवाय पाकिस्तानने सर्वाेच्च खेळ केला, असे विराट कोहली म्हणाला.
एका पत्रकाराने विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हनसंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर विराटने नाराजीच्या सूरात उत्तर दिले. तुम्हाला वाद निर्माण करायचा आहे का? तसे असल्याच याची अगोदर कल्पना द्या? रोहित शर्मा गोल्डन डक झाला म्हणून त्याला संघातून बाहेर काढाला का? हा खोचक प्रश्न विचारत विराटने पत्रकाराची बोलती बंद केली.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली. बाबरने टॉस जिंकल्याचा पूरेपूर फायदा घेत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुल आणि सुर्यकुमार यादवही स्वस्तात माघारी फिरले. विराट कोहलीने एका बाजूने खिंड लढवली. त्याला रिषभ पंतने उत्तम साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला निर्धारित 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे, असे वाटत होते. पण पाकिस्तानचा सलामीवीर रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी एकहाती सामना जिंकत टीम इंडियाला दणका दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.