Virat Kohli Hardik Pandya and entire team sing Vande Mataram at Wankhede video sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

'मां तुझे सलाम...', विराट-हार्दिकने तयार केला माहौल! वानखेडेवर 'वंदे मातरम'चा गजर; BCCI शेअर केला 'तो' Video

Kiran Mahanavar

Vande Mataram at Wankhede video: एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे समुद्राशी स्पर्धा करणारा विराट गर्दीचा महापूर जिगरबाज विश्वविजेत्या इंडिया टीमच्या स्वागतासाठी मरिन लाईन्सवर आज दुपारपासून लोटला होता. हातात झेंडे, अंगाला लपेटलेले तिरंगी झेंडे ‘इंडिया इंडिया...’ असा तुफान जल्लोष करीत तरुणाईचा सळसळता उत्साह दिसत होता.

विश्वविजेत्या इंडियाच्या टीमची आज संध्याकाळी एनसीपीए ते वानखेडे स्टेडियम अशी विजय यात्रा काढण्यात आली. चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियममध्ये विजेत्या टीमचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर तिरंगा घेऊन परेडही काढली. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये वंदे मातरमचा गजर झाला, विराट कोहली आणि हार्दिक पांड्याही मोठ्या आवाजात गात होते. हा खास व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पोस्ट केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी चाहतेही मोठ्या संख्येने आले होते. यावेळी सर्व खेळाडूंनी स्टेडियममध्ये फेरफटका मारला आणि वंदे मातरमच्या गजरात चाहत्यांचे आभार मानले. वंदे मातरम गाण्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या आघाडीवर होते. या दोघांना पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

टीम इंडियाला मिळाले 125 कोटी रुपये

टीम इंडियाचा सन्मान करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर एक छोटासा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व खेळाडूंना मंचावर बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला. इतकेच नाही तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) संपूर्ण टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेशही देण्यात आला. ज्यासाठी संपूर्ण टीमला मंचावर एकत्र बोलावण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

NIA Raid : ‘एनआयए’चे देशभर २२ ठिकाणी छापे; संशयास्पद साहित्य जप्त, राज्यामध्येही कारवाई

Narendra Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Rahul Gandhi : आरक्षण मर्यादा वाढवणारच! कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

Calcutta Crime : पश्चिम बंगाल पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

SCROLL FOR NEXT