Virat Kohli Video Viral T20 World Cup 2024 SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : भारत-बांगलादेश मॅचमध्ये हे काय घडलं? विराट कोहली घुसला स्टेजखाली, व्हिडिओ होतोय व्हायरल

Kiran Mahanavar

Virat Kohli Video Viral T20 World Cup 2024 : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 सुपर-8 मधील आपला दुसरा सामना देखील जिंकला आहे. पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला होता. यानंतर संघाने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सुपर-8 मधील संघाचा शेवटचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.

भारतीय संघ सुपर-8 मध्ये आपले दोन्ही सामने जिंकून गटात अव्वल स्थानावर आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने असे काही केले ज्याने चाहत्यांना गली क्रिकेट क्रिकेटची आठवण झाली.

भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही त्याच्या अनोख्या कामगिरीसाठी ओळखला जातो. पण वेस्ट इंडिजमधील अँटिग्वाच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यातही विराट कोहलीने असे काही केले की लोक थक्क झाले.

खरंतर, सामन्यादरम्यान विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता आणि बांगलादेशचा फलंदाज रियाद महमुदुल्लाहने षटकार ठोकला. षटकारानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर एका स्टेजखाली गेला. तिथे बॉल बॉय नसल्याने विराट कोहली स्वतः बॉल उचलायला गेला. त्याने स्टेजच्या खाली घुसून बॉल बाहेर काढला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT