Rohit Sharma - Virat Kohli
Rohit Sharma - Virat Kohli Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: निवृत्ती घेण्यापूर्वी रोहित-कोहलीने रचला इतिहास; आजपर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवलाय

प्रणाली कोद्रे

Rohit Sharma - Virat Kohli: शनिवारी (२९ जून) भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अवघ्या ७ धावांनी पराभूत केलं. यासह भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी२० वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी भारताने २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.

दरम्यान, यंदाचा टी२० वर्ल्ड कप भारतीय चाहत्यांसाठी आणखी काही कारणांसाठी भावनिक होता. कारण हा सामना राहुल द्रविडचा भारताचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना होता, तर या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

पण निवृत्तीपूर्वी त्यांनी भारताला टी२० वर्ल्ड कप जिंकून देत मोठे इतिहास रचले आहेत.

विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू

विराटने हा टी२० वर्ल्ड कप जिंकणारा तो ४ वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेक क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने २००८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप कर्णधार म्हणून जिंकला होता.

त्यानंतर त्याने २०११ साली वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली. यानंतर आता त्याने रोहितच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप विजयाचं स्वप्नही साकार केलं. तो या चार ट्रॉफी जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.

रोहित पहिलाच भारतीय

रोहित शर्मासाठी हा नववा टी२० वर्ल्ड कप होता. आजपर्यंत झालेले सर्व टी२० वर्ल्ड कप रोहितने खेळले आहेत. तो २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचाही भाग होता. या विजेतेपदानंतर त्याने तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० वर्ल्ड कप विजयाचा आनंद घेतला. त्यामुळे तो दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय ठरला.

रोहित-विराटची टी२० कारकिर्द

रोहित आणि विराट आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनुक्रमे एक आणि दोन क्रमांकावर आहेत.

रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५९ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या, ज्यात ५ शतके आणि ३२ अर्धशतके आहेत.

विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १२५ सामन्यांत ४८.६९ च्या स्ट्राईक रेटने ४१८८ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतके केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोरेगावमधील रहिवाशांना High Court चा मोठा दिलासा; 'या' भूखंडावरील अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्याचे निर्देश

जयंत पाटलांचा 'हा' पॅटर्न राज्यात राबविणार; उपमुख्यमंत्री अजितदादांची मोठी घोषणा, नेमका कोणता आहे पॅटर्न?

Jalgaon News : नाल्यातून चेंडू काढताना सहावर्षीय बालक गेला वाहून; पोलिसांकडून शोध सुरू

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यात अकोल्याचा जवान शहीद; गावावर शोककळा, चार दहशतवाद्यांचा खात्मा

Monsoon Care Tips : पावसाळ्यात त्वचेच्या संसर्गाचे होऊ शकतात हे गंभीर आजार, वेळीच ओळखा लक्षणे

SCROLL FOR NEXT