Virat Kohli receives ICC ODI Player of the Year 2023 award : विराट कोहलीही टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात सहभागी झाला नसला तरी मात्र विराट या स्पर्धेत थैमान घालण्यासाठी सज्ज आहे. कारण टी-20 वर्ल्ड कपमधील कोहलीचे आकडेही खूप प्रभावी आहेत. न्यूयॉर्कला पोहोचल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विराटचा विशेष सन्मान केला.
विराट कोहलीने 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. विशेष एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये कोहलीने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते कोणीही विसरू शकत नाही. 2023 या वर्षी विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. आता न्यूयॉर्कमध्ये आसीसीने विराट कोहलीला ODI प्लेयर ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ज्याचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
विराट कोहलीने 2023 मध्ये 27 एकदिवसीय सामने खेळले. ज्याच्या 24 डावात कोहलीने 1377 धावा केल्या. यादरम्यान विराटची सरासरी 72.47 तर स्ट्राईक रेट 99.13 होता. गेल्या वर्षी कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली होती. गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यान कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 94 चेंडूत 122 धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी खेळली होती.
दोन्ही संघांमधील हा सुपर फोरमधील महत्त्वाचा सामना होता. याशिवाय 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. कोहलीने या स्पर्धेत 11 सामने खेळले, ज्यामध्ये विराटने 765 धावा केल्या. या काळात कोहलीने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.