Virat Kohli  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli Retirement: विराटनं भावनिक करत घेतली T-20 मधुन exit! हे ओपन सिक्रेट... आता नव्या पिढीकडे बॅटन सुपूर्द

Pranali Kodre

Virat Kohli Retirement: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारताने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. दरम्यान, हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी वैयक्तिक रित्याही भावूक ठरला.

त्याने अंतिम सामन्यात ५९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. ही खेळी भारतासाठी महत्त्वाची ठरली. तो या सामन्याचा सामनावीरही ठरला. पण सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर विराट अत्यंत भावूक झाला होता. त्याने या पुरस्कार जिंकल्यानंतर सांगितले 'हा माझा शेवटचा टी२० वर्ल्ड कप आहे. हेच आहे जे आम्हाला मिळवायचे होते. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटते की तुमच्या धावा होत नाहीये आणि मग हे असं होतं. ईश्वर महान आहे. आत्ता नाही, तर कधीच नाही, अशी परिस्थितीत होती.'

विराट टी२० मधून निवृत्ती घेताना म्हटला, 'हा माझा भारतासाठी शेवटचा टी२० सामना आहे. आम्हाला ही ट्रॉफी उंचवायची होती. हे एक ओपन सिक्रेट होते. हे असं नाहीये की आम्ही जर हरलो असतो, तर मी घोषित केले नसते. हे ठरलेलं होतं.

'आता पुढच्या पिढीने टी२० क्रिकेट पुढे नेण्याची वेळ आहे आणि चमत्कार घडवण्याची वेळ आहे, जे आम्ही आयपीएलमध्ये पाहिले आहे. मला यात काहीच शंका नाही, ते तिरंगा उंच फडकावतील.'

विराट पुढे म्हणाला, 'आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली होती. मी फक्त एकटा नाही, तर तुम्ही रोहितकडेही पाहा, त्याने ९ टी२० वर्ल्ड कप खेळले, हा माझा सहावाच होता. संघातील प्रत्येकाप्रमाणेच तो या विजयासाठी पात्र होता. आम्ही जिंकलोय, याचा आनंद आहे.

'जेव्हा ईश्वराला तुम्हाला काहीतरी द्यायचे असते, तेव्हा तुम्ही कल्पनाही केलेली नसेल अशा मार्गाने तो ते देतो. मी खूप कृतज्ञ आणि नम्र आहे. हे सर्व कठीण होते आणि म्हणूनच भावना व्यक्त झाल्या. आम्ही शानदार पुनरागमन केले. मी यापेक्षा आणखी काही जास्त मागू शकत नाही.'

विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १२५ सामन्यांत ४८.६९ च्या स्ट्राईक रेटने ४१८८ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतके केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT