Virat Kohli
T20 World Cup Virat Kohli News Marathi  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs SA: 'विराट शतक करणार अन् भारत वर्ल्ड कप जिंकणार', फायनलपूर्वी दिग्गजाची भविष्यवाणी

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोहलीने सध्या सुरू असलेल्या T20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात केली, पण यावेळी तो खराब फॉर्मशी झुंजताना दिसला.

पण असे असतानाच इंग्लंडचा माजी डावखुरा स्पिनर मॉन्टी पनेसरने स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. मॉन्टीने सांगितले की, विराट कोहली T20 वर्ल्डकपमध्ये 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध शतक ठोकणार आहे. 29 जून रोजी बार्बाडोस येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे.

सध्या सुरु असलेल्या T20 वर्ल्डकप मध्ये  विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजत आहे. विराटने आतापर्यंत सात डावांमध्ये १०.७१ च्या सरासरीने केवळ ७५ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत विराट दोनदा शून्यावर बाद झाला आहे.

एएनआई सोबत बोलताना मॉन्टी पनेसर म्हणाला की, भारत T20 वर्ल्ड जिंकेल आणि विराट कोहली शतक झळकावेल.

विराट कोहलीने उपांत्य फेरीत रीस टोप्लीच्या चेंडूवर मिडविकेटवर शानदार षटकार ठोकला. मात्र, पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. कोहलीच्या खराब फॉर्मचा रोहित शर्मानेही बचाव केला आहे. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर रोहितला विराट लवकरच फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा होती.

रोहितनही केला विराटचा बचाव

सेमीफायनल जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता नसल्याचे सांगितले होते. तो एक मोठा सामनावीर आहे.

रोहित म्हणाला होता की, विराट कोहली अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करेल. 15 वर्षे क्रिकेट खेळल्यास फॉर्ममध्ये अडचण येत नाही, असेही रोहित म्हणाला होता. विराट कोहलीने मोठ्या सामन्यांमध्ये भारताला संकटातून बाहेर काढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Sudha Murty: सुधा मूर्तींनी खासदार म्हणून पहिल्यांदाच केलं राज्यसभेत भाषण; सर्वत्र होतंय कौतुक

Babar Azam : आधी आर्मी ट्रेनिंग आता गादीवर डाईव्हची प्रॅक्टिस... पाकिस्तान संघाचा अजब सराव

Hemant Soren: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री; चंपई सोरेन यांनी दिला राजीनामा

Hardik Pandya : आता कोणी हार्दिकला ट्रोल करून दाखवाच.... भारताच्या माजी क्रिकेटपटूनं भारला सज्जड दम

SCROLL FOR NEXT