Pakistan Cricket team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: 'पाकिस्तानी खेळाडूंनी आता दुबईवरून घरी जावं...', स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर माजी खेळाडूचा घरचा आहेर

Pranali Kodre

Wasim Akram: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अमेरिका संघाने इतिहास घडवला आहे. पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळताना अमेरिकेने अंतिम ८ संघात स्थान मिळवले आहे. अ गटातून भारतापाठोपाठ अमेरिका संघाने सुपर-8 फेरीत प्रवेश केला आहे. मात्र यामुळे कॅनडा, आयर्लंडसह गतउपविजेते पाकिस्तान संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत 14 जून रोजी होणारा अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. त्याचमुळे अमेरिकेचे 5 गुण झाले. यासह अमेरिकेने या स्पर्धेतील पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर-8 मध्ये प्रवेश केला.

दरम्यान, पाकिस्तानला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागल्यानंतर टीकेला सामोरे जावे लागले आहे. यापूर्वीच पाकिस्तान संघावर टिकास्त्र सोडलेल्या वसीम अक्रमने पुन्हा एकदा संघावर निशाणा साधला आहे.

अमेरिका आणि आयर्लंड यांचा सामना रद्द झाल्यानंतर आयसीसीच्या प्रेझेंटेटरने अक्रमला पुढील योजना काय असं विचारल्यानंतर अक्रम म्हणाला, 'अमेरिका संघाचे अभिनंदन. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली.'

'जेव्हा तुम्ही खेळाचं जागतिकीकरणाबद्दल बोलता, ते हेच आहे. अमेरिका संघ सुपर-8 साठी पात्र ठरले. ते यासाठी पात्र होते. त्यांनी साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे ते याठिकाणी आहेत.'

'पाकिस्तानसाठी योजना काय तर, EK-601 ने दुबईला जायचं आणि खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या शहरात निघून जायचं. त्यानंतर काय होतंय पाहू.' अक्रमचा व्हिडिओ आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अमेरिका संघाने पहिल्या फेरीत कॅनडाला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये मात दिली होती. त्यानंतर त्यांना भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, तर आयर्लंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.

पाकिस्तानबद्दल सांगायचे झाले, तर त्यांना अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताविरूद्धही पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी कॅनडाविरुद्ध विजय मिळवला. आता त्यांचा आयर्लंडविरुद्धचा सामना बाकी आहे. मात्र, हा सामना त्यांनी जिंकला किंवा रद्द झाला, तरी ते 5 गुणांपर्यंत पोहचू शकत नसल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT