Rohit Sharma - Virat Kohli Dance: भारतीय क्रिकेट संघ आणि चाहते २९ जूननंतर आलेला ४ जुलै हा दिवसही कधी विसरू शकणार नाही.
भारतीय संघाने २९ जून रोजी बार्बाडोसला दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत टी२० वर्ल्ड कप दुसऱ्यांदा उंचावला. या विजेतेपदानंतर भारतीय संघ गुरुवारी (४ जुलै) भारतात परतला. भारतात परतल्यानंतर खेळाडूंचे जंगी स्वागत झाले.
भारतीय संघाचा ताफा गुरुवारी संध्याकाळी मुंबईत पोहचला. मुंबईत आल्यानंतर भारतीय संघाची ओपन बसमध्ये नरिमन पाँइंट ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी लाखो क्रिकेट चाहते मरिन ड्राईव्हवर उपस्थित होते.
दरम्यान, वानखेडे स्टेडियममध्येही हाजारोंच्या संख्येत चाहत्यांनी हजेरी लावली होती. वानखेडे स्टेडियमवर विजेत्या भारतीय संघाचा गौरव करण्यात आला. यावेळी खेळाडूंनीही जोरदार सेलिब्रेशन केले.
या सेलिब्रेशनवेळी ढोल-ताशांचाही गजर झाला होता. याचवेळी ढोल-ताशांच्या गजरात भारतीय संघानेही ताल धरला. विराटने नाचायला सुरुवात करताच रोहितनेही त्याला पाहून नाचायला सुरुवात केली.
संघातील दोन दिग्गजांना नाचताना पाहून भारतीय संघातील खेळाडू आणि इतर सदस्यही त्यांच्यात सहभागी झाले. भारतीय संघ नाचतानाचा हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, टी२० वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५९ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या, ज्यात ५ शतके आणि ३२ अर्धशतके आहेत. तसेच विराटने १२५ सामन्यांत ४८.६९ च्या स्ट्राईक रेटने ४१८८ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतके केली.
जडेजाने ७४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ५१५ धावा केल्या, तर ५४ विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.