Why Virat Kohli Announced His Retirement From T20I
Why Virat Kohli Announced His Retirement From T20I sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli T20i Retirement : वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच विराट कोहलीने का घेतली निवृत्ती? जाणून घ्या 'त्या' मागील मोठे कारणे

Kiran Mahanavar

Why Virat Kohli Announced His Retirement From T20I : टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने लाखो स्वप्ने पूर्ण केली आहेत. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने 7 धावांनी अविश्वसनीय विजयाची नोंद केली.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात दमदार खेळी केली. या विजयानंतर विराट कोहलीने मोठी घोषणा करत आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. अंतिम सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, भारतासाठी हा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता.

विराट कोहलीने भारतासाठी शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 76 धावांची शानदार खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. टीम इंडिया चॅम्पियन बनल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, आता युवा खेळाडूच्या हातात धुरा हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप होता. आता पुढच्या पिढीची वेळ आली आहे.

विराट कोहलीचे चाहते त्याच्या निवृत्तीमुळे खूप नाराज झाले आहेत पण विराट कोहलीच्या निवृत्तीची 3 प्रमुख कारणे कोणती होती ते आम्ही तुम्हाला सांगतो..

युवा खेळाडूंना संधी

निवृत्तीची घोषणा करताना विराट कोहली म्हणाला की, आता युवा पिढीने संघाची धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे. हे देखील अगदी खरे आहे कारण आता पुढचा टी-20 वर्ल्ड कप 2 वर्षांनी होणार आहे आणि तोपर्यंत विराट कोहलीचा फॉर्म आणखी कमी होऊ शकतो आणि त्यावेळी त्याचे वय देखील 37 वर्षे असेल. टी-20 हा तरुणांचा खेळ आहे आणि कदाचित याच कारणांमुळे विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली.

टी-20 मध्येआक्रमक फलंदाजी करण्यात पडला कमी

या संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपवर नजर टाकल्यास विराट कोहली आवश्यकतेनुसार फलंदाजी करू शकला नाही. विराट कोहली हा खूप मोठा फलंदाज आहे आणि त्याच्या क्षमतेबद्दल शंका नाही, पण असे असूनही टी-20 मध्ये खूप वेगवान फलंदाजी आवश्यक आहे. पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारावे लागतात. या संपूर्ण वर्ल्ड कपदरम्यान विराट कोहलीला वाटले असेल की कदाचित टी-20 मधील डाव संपवण्याची वेळ आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी

भारतीय संघाला पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप खेळायची आहे. विराट कोहलीने आधीच या दोन स्पर्धांवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिले होते. या कारणास्तव, त्याने या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्यासाठी भारतीयांचे मतदान निर्णायक;‘युगोव्ह’चे सर्वेक्षण, ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ला कमी समर्थन

Smriti Vishwas Narang: बॉलीवूडची 'मॉडर्न गर्ल' स्मृती विश्वास नारंग काळाच्या पडद्याआड

Hathras Stamped : पिलुआ थाने आ जावो, छोटा खतम हो गया;हाथरसच्या चेंगरीचेंगरीतील पीडित पालकाचा आर्त टाहो

Ashadhi Wari : उन्हाच्या झळा, नामस्मरण अन् मोठी वाटचाल;संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सर्वांत मोठा टप्पा पार

Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! खासगी रुग्णालयात उपचार सुरु

SCROLL FOR NEXT