afg vs oman warmup match washed out abandoned due to rain t20 world cup 2024 sakal
क्रिकेट

T20 World Cup 2024 : ICC टेन्शनमध्ये! दोन महत्त्वाचे सामने रद्द; स्पर्धेआधी वाजली धोक्याची घंटा...

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 : आसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2024ची उलटी गिनती सुरू झाली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 चे यजमानपद यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या हातात आहे. आणि भारतीय वेळेनुसार ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे.

मात्र, मुख्य कार्यक्रमापूर्वीच क्रिकेट आसीसी आणि चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. सध्या खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यांमध्ये पावसाचा कहर पाहिला मिळत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक दोन महत्त्वाचे सामने रद्द करण्यात आहेत. अशा परिस्थितीत मुख्य स्पर्धेच्या सामन्यामध्येही पावसाचा कहर पाहिला मिळू शकतो.

T20 वर्ल्ड कपपूर्वी दोन महत्त्वाचे सामने रद्द

27 मे ते 1 जून या कालावधीत अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वर्ल्ड कपचे सराव सामने खेळवले जात आहे. वर्ल्ड कपपूर्वी एकूण 16 सराव सामने होणार आहेत. मात्र पहिल्या 8 सामन्यांपैकी 2 पावसामुळे रद्द झाले आहेत.

28 मे रोजी बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात खेळलेला सामना पावसामुळे वाहून गेला होता. त्याचवेळी 29 मे रोजी अफगाणिस्तान आणि ओमान यांच्यातील सराव सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. हा सामना त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार होता, पण पावसामुळे होऊ शकला नाही.

30 मे रोजी सराव सामन्यांचे वेळापत्रक

  • नेपाळ वि यूएसए, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, ग्रँड प्रेरी, टेक्सास

  • स्कॉटलंड विरुद्ध युगांडा, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो

  • नेदरलँड विरुद्ध कॅनडा, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, ग्रँड प्रेरी, टेक्सास

  • नामिबिया विरुद्ध पापुआ न्यू गिनी, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो

  • वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE Updates: गुलिगत धोकाने करून दाखवलं! सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT