Mohammed Shami  esakal
क्रिकेट

टीम इंडियाच्या चिंतेत वाढ! शमीनंतर युवा जलदगती गोलंदाजाला दुखापत झाल्याची भीती, IND vs AUS मालिकेपूर्वी धक्का?

India vs New Zealand injury scare : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकताच आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला.

Swadesh Ghanekar

India vs New Zealand Test Series : बांगलादेशचा कसोटी मालिकेत पराभव केल्यानंतर भारतीय संघ आणखी एक मालिका गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली हे नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहेत. भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय आणि त्यासाठी बीसीसीआयने संघही जाहीर केला आहे. या मालिकेतून प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती, परंतु त्याचे संघात नावच नाही. मागील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपासून तो भारतीय संघाबाहेर आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता, परंतु तेथे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळेच त्याचे पुनरागमन लांबले. शमीच्या अनुपस्थितीचा धक्का बसला असताना टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

भारताच्या आणखी एका युवा जलदगती गोलंदाजाला दुखापत झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) याने रणजी करंडक स्पर्धेतील कर्नाटक विरुद्ध मध्य प्रदेश लढतीच्या तिसऱ्या दिवशी मैदानातून माघार घेतली. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, कारण प्रसिद्धचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार केला जाऊ शकतो. प्रसिद्ध हा ८ महिन्यानंतर दुखापतीतून सावरल्यानंतर नुकताच दुलीप ट्रॉफीत खेळला होता, परंतु आता रणजी करंडक स्पर्धेतील दुखापतीने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

प्रसिद्धला दुखापत झालीय का, याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु तो रणजी करंडक लढतीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर आला नाही. २८ वर्षीय गोलंदाजाला सामन्याच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजीसाठी रन अप घेताना अडखळत होता. होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीचे पहिले दोन दिवस पावसामुळे वाया गेले आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी प्रसिद्धच्या नावाचा विचार सुरू आहे, परंतु आता त्याला दुखापत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढू शकते.

प्रसिद्ध कृष्णाचा आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे.

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप. राखीव खेळाडू- हर्षित राणा, नितीश रेड्डी, मयांक यादव, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT