Babar Azam | Shaheen Afridi Sakal
क्रिकेट

Babar Azam: 'जर तुम्ही एमएस धोनी असता तर...', बाबर आझमला पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार करण्याबद्दल माजी क्रिकेटर भडकला

Pranali Kodre

Pakistan Cricket Team Captain: पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या हालचाली झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेतृत्वबदलापासून ते प्रशिक्षक बदलापर्यंत अनेक बदल झाले.

वर्ल्ड कप २०२३ मध्ये उपांत्य फेरीत पाकिस्तानला पोहचला न आल्याने कर्णधार बाबर आझमवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारातील नेतृत्वपदाचा राजीनामा दिला.

यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद पाकिस्तानने वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे सोपवले, मात्र त्याच्या नेतृत्वातील निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा एकदा टी२० संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे देण्यात आले. त्यामुळे आता चालू असलेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

आता याबद्दलच पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शेहजादने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली. महत्त्वाचे म्हणजे तो ही टीका करत असताना त्याचे माजी क्रिकेटपटू इमाम-उल-हकबरोबर बाचाबाचीही झाली. जियो टीव्हीवर टी20 वर्ल्ड कपच्या तयारीबद्दलच्या शोमध्ये शेहजाद आणि इमाम यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली.

शेहजाद म्हणाला, 'बाबर आझमबद्दल बोलायचे झाले, तर दोस्ती-यारीची बात आहे. तो काही खेळाडूंना बऱ्याच काळापासून पाठीशी घालत आहे, ते खेळाडू फॉर्ममध्येही नाहीत, हे चांगले वाटत नाहीये. मी जर सामने मोजले, तर तुम्हाला समजेल की खेळाडूंना इतक्या संधी मिळत नाहीत.'

'जर दुसरा कर्णधार असता, तर त्याला ते समजले असते. क्रिकेट आपण फक्त द्विपक्षीय मालिका जिंकण्यासाठी नाही खेळत, तर आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी खेळतो. आपण गेल्या चार-पाच वर्षांत कोणती स्पर्धा जिंकली आहे का? जर नाही, तर मी म्हणेल की ही गँग आहे, मैत्री आहे, एक अशी टोळी जी क्रिकेटला चार-पाच वर्षांपासून मॅनिप्युलेट करत आहे.

तसेच २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत पाकिस्तानने विजेतेपद मिळवल्याबद्दल शेहजाद म्हणाला, 'सर्फराज अहमद आणि त्याच्या संघाने ते विजेतेपद मिळवले होते. त्याच्या नेतृत्वात आपण जिंकलो होतो. तुम्ही तुमच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप जिंका आणि सिद्ध करा.'

'तुम्हाला बराच वेळ मिळाला आहे, एका कर्णधाराला पाच मोठ्या स्पर्धा नेतृत्वासाठी मिळत नाहीत. तुम्हाला नेतृत्वावरून आधी दूर केलं आणि मग परत आणलं. मी समजू शकतो, जर तुम्ही एमएस धोनी असाल आणि तुम्हाला परत आणलं आहे, पण शाहिनबाबत हे चूकीचं झालं आहे. त्याला तुम्ही दोन सामन्यासाठी कर्णधार केलं आणि काढून टाकलं.'

शेहजादच्या या वक्तव्यावर इमाम म्हणाला, 'बाबरला त्याच्या मर्जीशिवाय नेतृत्वावरून हटवलं होतं आणि नंतर त्याला त्याच्या मर्जीने कर्णधार करण्यात आले. २०२१ मध्ये टी२० वर्ल्ड कपला आपण उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलो, २०२२ टी२० वर्ल्ड कपला अंतिम सामन्यापर्यंत पोहचलो, याचा अर्थ संघाची कामगिरी चांगली झाली.'

'अंतिम सामन्यात आपण चमक दाखवू शकलो नाही. तुम्ही असं म्हणू शकता की बाबर आझमला काही खेळाडू आवडतात, पण मैत्रीमुळे ते संघात आहेत असं म्हणणं थोडं वैयक्तिक झालं.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बाबर आझम आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT