KL Rahul captaincy IPL 2025 sakal
क्रिकेट

KL Rahulच्या कर्णधारपदाला धोका; मालक शोधणार दुसरा पर्याय? स्टार खेळाडूने केला खळबळजनक खुलासा

Kiran Mahanavar

KL Rahul captaincy IPL 2025 : दरवर्षीप्रमाणेच आगामी आयपीएल हंगामातही काही संघांचे कर्णधार बदललेले दिसणार आहेत, ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. आयपीएल 2024 मध्ये राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊकडून खेळलेला अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

केएल राहुल आयपीएल 2022 पासून लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. त्याच्या संघाने पहिल्या दोन हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले, परंतु आयपीएल 2024 मध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही.

त्याचवेळी, नुकत्याच झालेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात एकतर्फी पराभव झाल्यानंतर एलएसजीचे मालक संजीव गोयंकाही केएल राहुलवर नाराज दिसले होते. या प्रकरणाने बरीच चर्चा रंगली होती. तेव्हापासून अशी अटकळ बांधली जात आहे की कदाचित एलएसजी संघ पुढील हंगामासाठी कर्णधारपद बदलू शकतो.

लखनऊ सुपर जायंट्सचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलच्या आयपीएल कर्णधारपदावर मोठा खुलासा केला आहे. जेव्हा शुभंकरने मिश्राला विचारले की केएल राहुल पुढच्या हंगामात लखनऊचा कर्णधार राहणार की त्याला काढून टाकणार, की लखनऊ आणखी काही पर्याय पाहणार? याला उत्तर देताना अमित म्हणाला की, "१०० टक्के लखनऊ कर्णधार म्हणून दुसरा चांगला पर्याय पाहणार.

पॉडकास्टमध्ये अमित मिश्राला शुभमन गिलच्या कर्णधारपदावर त्यांचे मत विचारण्यात आले, ज्याला त्याने स्पष्टपणे उत्तर दिले. गिलने अलीकडेच झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्व केले आणि टीम इंडियाला 4-1 ने विजय मिळवून दिला. असे असूनही गिलचे आयपीएलचे कर्णधारपद पाहता, तो सध्या भारतीय संघाचे कर्णधारपदासाठी योग्य नसल्याचे अनुभवी गोलंदाजाला वाटते.

अमित मिश्रा म्हणाला की, "मला वाटत नाही की शुभमन गिलला कर्णधार बनवायला हवे. मी त्याला बनवणार नाही. मी त्याला नुकतेच आयपीएलमध्ये पाहिले. त्याला कर्णधार कसे करावे हे माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पना नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT